□ आमदार रणजीतसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रयत्नांना यश
अकलूज : माळशिरस, श्रीपूर – म्हाळूंग, नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेत क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत प्राथमिक सोयी सुविधा करीता एकूण ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. Malshiras: Municipal council approves a fund of Rs. 5 crore for municipal council
अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधेकरीता २ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामध्ये इंदिरानगर वसाहत क्रांतीसिंह घरकुल येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३०लक्ष रूपये, विजयनगर कॉलनी येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये, शिवाजीनगर चौक येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये, रामायण चौक जुना माळीनगर रोड येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – ३० लक्ष रूपये, महानुभव मठ (लोणारगल्ली) येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे २० लक्ष रूपये,काझी गल्ली येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे २० लक्ष रूपये,महर्षी कॉलनी २१ खोल्या शाळा पाठीमागे येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये,नामदेव मंगल कार्यालय समोर येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये या कामांचा समावेश आहे.
माळशिरस नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधेकरता १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये होलार गल्ली, माउली चौक माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, ५८ फाटा वडर गल्ली, माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, अकलूज रोड, रेल्वेलाईन माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, हनुमान व्यायाम शाळा (जुनी धनगर तालीम) माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे,६१ फाटा देशमुख वस्ती माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे,आठवडा बाजार तळ माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, फुलेनगर, माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589667606044306/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
श्रीपूर-म्हाळूंग नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता १ कोटी रूपयांचा निधी मंजूर खालील कामे मंजूर झाली आहेत यामध्ये व्यापारपेठ श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणे, मिलिंदनगर श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणे, आनंदनगर श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणे, जगदिशनगर येथे शौचालय बांधकाम करणे, महाळुंग गट नं.२ येथे शौंचालय बांधकाम करणे महाळुंग गावठाण येथे शौचालय बांधकाम करणे.
नातेपुते नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असून खालील कामे मंजूर झाली आहेत यामध्ये बरडकर वस्ती रस्ता (बाजारतळ कोपरा) शौचालय बांधणे, समाजभूण नगर येथे शौचालय बांधणे, मुलाणी वस्ती येथे शौचालय बांधणे, विसांवा चौक येथे शौचालय बांधणे, साठनेगर येथे शौचालय बांधणे, टेलिफोन ऑफिसजवळ येथे शौचालय बांधणे, नगरपंचायत कार्यालय नजिक येथे शौचालय बांधणे, गिरजानगर तळ्यालगत येथे शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589569722720761/