सोलापूर : सोलापूरमध्ये 13 ते 15 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील हा प्रकार आहे. काल रात्री जेवण केल्यानंतर विद्यार्थिनींना आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाला. या सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Women polytechnic women poisoned by food in college hostel in Solapurat
तुळजापूर मार्गावर असलेल्या रुपाभवानी चौकाजवळील श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित वुमन्स पॉलिटेक्निक, वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज येथील चौदा विद्यार्थिनींना ही विष बाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर रूग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहात राहतात. काल मंगळवारी (ता. 26 ) रात्री विद्यार्थीनी जेवण करून झोपल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री या विद्यार्थीनीना मळमळू लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींना उलटी जुलाब झाले त्या तशाच झोपी गेल्या. आज बुधवारी सकाळी दिवसभरात उपचारासाठी दाखल केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590388452638888/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या. त्यांना भोजनातून किंवा पाण्यातून प्रादुर्भाव झाल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यातील आठ विद्यार्थिनींना एस.टी. स्टँडजवळील सिध्देश्वर हॉस्पिटल येथे आणि सहा विद्यार्थिनींना भवानी पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सर्व बाधित विद्यार्थिनींची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींवर शिक्षण संस्था प्रतिनिधी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर योग्य उपचाराची व्यवस्था होत आहे का नाही, यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील इतर अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली आहे. सर्व विद्यार्थिनीची विचारपूस केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
□ परगावी असलो तरी लक्ष ठेवून
विद्यार्थिनी आणि पालक यांना कसलाही अधिक त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आपण स्वत: परगावी असल्याने घटनास्थळी समक्ष येऊ शकलो नाही. परंतु परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून योग्य ते निर्णय घेतले जात असल्याचे श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590380355973031/
□ भोगाव येथील गोदाम फोडून अंगणवाडीचे धान्य पळविले
सोलापूर – भोगाव (ता.उत्तर सोलापूर) येथील गोदामात ठेवलेले ८० हजाराचे धान्य चोरट्याने पळविले. ही चोरी २४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजनेतील धान्य आणि कडधान्य वैभव भगवान देवकर (रा.इंदापूर) यांनी भोगावच्या गोदामात ठेवले होते. रविवारी (ता. 24) दुपारच्या सुमारास चोरट्याने गोदामाचे शटर उचकटून त्यातील ८० हजार रुपये किमतीचे धान्य चोरून नेले. या चोरीची नोंद तालुका पोलिसात झाली. हवालदार देवकर पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590443022633431/