सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक किशोर चंडक यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री चंडक यांनी बांधकाम, रक्तदान, जलसंधारण, दुर्मिळ नाणे व तिकीट संग्रहायक, शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. Solapur University Lifetime Achievement Award Announced! Announcement of various awards
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केली आहे. यात सोलापूर ही जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी किशोर चंडक हे ठरले आहेत. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोमवार, दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी विद्यापीठाचा 18 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/591581782519555/
विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कार दिले जातात. त्यासाठी दरवर्षी संबंधितांकडून प्रस्ताव मागवून घेऊन निवड समितीद्वारे निवड केली जाते. एक ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते. वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. बी. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.
□ यांना जाहीर झाले पुरस्कार
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. शंकरराव पाटील, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी
3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: डॉ. माया पाटील, सामाजिकशास्त्रे संकुल, विद्यापीठ कॅम्पस
4) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: श्री गिरीश कुलकर्णी, विद्यापीठ अभियंता.
□ धुळे व बनकर यांना शिष्यवृत्तीचा पुरस्कार
कल्याण येथील शाहू शिक्षण संस्थेकडून मिळालेल्या निधीच्या रकमेतून प्रतिवर्षी उपेक्षित वर्गातून प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास राजश्री शाहू महाराज यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. तीन हजार रुपये रोख रकमेच्या हा पुरस्कार वसुंधरा महाविद्यालयातील सोमनाथ धुळे या विद्यार्थ्यास प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांच्याकडून मिळालेल्या निधीच्या रकमेतून चारही विद्याशाखा अंतर्गत पदवी अभ्यासक्रमातील सर्वात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास डॉ. बी. वाय. यादव शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा ही शिष्यवृत्ती शिवाजी महाविद्यालय, बार्शीची विद्यार्थिनी दिव्या बनकर हिने पटकाविले आहे. तीन हजार रुपयाचा हा पुरस्कार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591552695855797/