Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या

Surajya Digital
Last updated: 2022/08/04 at 1:24 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)■ विवाहित महिलेची आत्महत्या■ कासेगाव येथे कटींग दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरून जाणाऱ्या 4 जणांना रेल्वेने धडक दिली. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळावर दारूच्या बाटल्याही आढळल्या आहेत. त्यामुळे हे 4 ही जण दारू पित बसले असताना हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत. Pandharpur: Three Bihari laborers killed in train collision, bottles found on track

 

यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यापैकी एकाची उपचारादरम्यान प्राणज्येत मालवली. त्यामुळे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघात की घातपात याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.  हेमलाल गोविंद ठाकूर (वय ३०), पंकज रामचरण मिरवी (वय २४) व सोनू तुलाराम यादव (वय १८) असे तिघांचा मृताची नावे  असून गोकूल फुलसिंग मिरवी (वय २०) या तरुणावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

 

रुळाजवळ दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या मजूर दारु प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे. चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/594625108881889/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याचं कळतं. पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरुन जाणाऱ्या चार बिहारी मजुरांना रेल्वेने धडक दिली.  हे चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे.

 

■ विवाहित महिलेची आत्महत्या

 

सोलापूर – फौजदार चावडी परिसरातील स्नेहसृष्टी पार्क येथील विहिरीत एका ५० वर्षीय विवाहित महिलेने उडी टाकून आत्महत्या केली.ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

सुवर्णा शिवाजी राऊत (वय ५० रा.संतोषनगर बाळे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे ती. काल रात्री घरातून निघून गेली होती. आज सकाळी तिचा मृतदेह पद्मावती नगर परिसरातील विश्वनाथ कांबळे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मयत सुवर्णा हिच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. ते दोघेही हेअर कटिंग दुकानात कामाला जातात. घरच्या विकट परिस्थितीला कंटाळून तिने हा प्रकार केला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद झाली. हवालदार घुगे पुढील तपास करीत आहेत.

■ कासेगाव येथे कटींग दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – पत्नी नांदत नसल्याने तसेच दारूच्या नशेत एका ३२ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोमवारी (ता. 1) सायंकाळच्या सुमारास घडली.
नागनाथ भगवान जाधव (वय ३२ रा. कासेगाव) असे मयताचे नाव आहे. काल सायंकाळी त्याचा मृतदेह घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नागनाथ याला दारूचे व्यसन असून त्याचा हेअर कटिंगचा व्यवसाय आहे.
दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन काही दिवसापूर्वी माहेरी गेली होती. त्यामुळे नागनाथ हा घरात एकटाच होता. काल सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार लाखाडे पुढील तपास  करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Pandharpur #Three #Bihari #laborers #killed #train #collision #bottles #track #solapur, #पंढरपूर #रेल्वे #धडक #तीन #बिहारी #मजूर #मृत्यू #रुळावर #आढळल्या #दारू #बाटल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा
Next Article ATM machine एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला; मोहोळ पोलिसाने दोघांना घेतले ताब्यात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?