Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर : बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर : बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराट

Surajya Digital
Last updated: 2022/08/04 at 9:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ठसे, नागरिकांची गस्तस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ठसे, नागरिकांची गस्त

पंढरपूर : पटवर्धन कुरोली व देवडे (ता. पंढरपूर) परिसरात मंगळवारी मध्यरात्री बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. Pandharpur: Panic in Patwardhan Kuroli, Devde area after sighting of a leopard-like animal

 

मंगळवारी (ता.2) मध्यरात्री दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या दोघांना बिबट्यासदृश्य प्राणी रस्त्यावरून जात असताना दिसला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे ही माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रात्रभर गस्त घालत जनावरे, घरांना पहारा दिला. अचानक हा प्राणी दिसल्याने नागरिक, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

देवडे (ता. पंढरपूर) येथील पांडुरंग गायकवाड यांना मुतखड्याचा त्रास होत असल्याने राहुल सोनटक्के हे त्यांना पटवर्धन कुरोली येथील दवाखान्यात उपचारासाठी रात्री अकराच्या दरम्यान घेऊन जात होते. समोर खड्डा आल्याने त्यांनी त्यांची चारचाकी गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी शेवतेच्या बाजूने पटवर्धन कुरोली नदी पात्राकडे हा बिबट्यासदृश्य प्राणी पटवर्धन कुरोली, देवडे रस्ता क्रॉस करून जाताना दिसला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अचानक हा प्राणी समोर दिसल्याने त्यांची घाबरगुंडी उडाली. ते इतरांना फोन करतानाही त्यांना बोलता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी परिसरातील नागेश उपासे व इतर शेतकऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना जागे केले व परिसरातील रस्त्यावर तोफा उडवून नागरिकांचे टोळके करून रात्रभर गस्त घालत पहारा दिला.

 

सकाळी घडलेला प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर वन विभागाचे वनमजूर दिलखुश मुलाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा प्राणी आढळलेल्या परिसराची पाहणी केली. शेताच्या परिसरात आढळलेले ठसेही घेतले व हे ठसे बिबट्यासदृश्य प्राण्याचेच असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितल्याचे नागेश उपासे यांनी सांगितले.

त्यामुळे नागरिकांनी येत्या काही दिवसात खबरदारी घेत रात्री एकटे न फिरण्याचा सल्ला त्यांनी दिला. रात्री अचानक देवडे, पटवर्धन कुरोली परिसरात हा प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

 

नागरिकांच्या तक्रारीनंतर त्या परिसरात जाऊन पाहणी करून त्या प्राण्याचे ठसे घेतले आहेत. ते ठसे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे पाहणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतर तो कोणता प्राणी आहे, हे निश्चित होईल. मात्र सध्या आम्ही परिसरातील नागरिकांना आपली घरे, जनावरे यांचे संरक्षण करत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे दिलखुश मुलाणी (वनमजूर, पंढरपूर वन विभाग) यांनी सांगितले.

 

 

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Pandharpur #Panic #Patwardhan #Kuroli #Devde #area #sighting #leopard-like #animal, #पंढरपूर #बिबट्यासदृश्य #प्राणी #पटवर्धन #कुरोली #देवडे #परिसरात #घबराट #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद : सोलापूरचे उदय उमेश लळित होणार सुप्रीम कोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश
Next Article टेंभुर्णीजवळ ट्रक -कारच्या धडकेत पती-पत्नी ठार, नातू जखमी

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?