Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिंहगडच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून केला रक्षाबंधन सण साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सिंहगडच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून केला रक्षाबंधन सण साजरा

Surajya Digital
Last updated: 2022/08/10 at 10:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज केगांव येथील विद्यार्थिनींनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथील पोलीस कर्मचाऱ्यांना व पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह पाटील यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. Students of Sinhagad celebrated Raksha Bandhan by tying rakhyas to the police solapur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)■ वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण

 

तसेच शाळेत ही यावेळी मुलीनी स्वत: बनविलेल्या राख्या मुलांना बांधल्या. यामध्ये के.जी. ते बारावी पर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला. राख्या बांधल्यानंतर मुलांनीही ओवाळणी म्हणून बहिणीला चॉकलेट दिले. अशा खेळी- मेळीच्या वातावरणात हा सण साजरा झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुझेन थॉमस,उपप्राचार्य प्रकाश नवले, मुख्याध्यापिका चेताली मराठे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मागर्दर्शन केले. या उपक्रमाचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी कौतुक केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

■ वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण

○ जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा : श्री काशी जगद्गुरू

पुणे : धर्मात अनेक व्रत आहेत. त्यापैकी सत्य हे एक व्रतच आहे. परमेश्वराने आपल्याला वाणी सत्य बोलण्यासाठीच दिली आहे. धर्माचरणाचे जे मार्ग आहेत त्यापैकी सत्य हा देखील एक मार्ग आहे. जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा आहे. सत्य बोलल्यामुळे पूज्यता येते. सत्यम् शिवम् सुंदरम् असे त्यासाठीच म्हटले आहे. असत्य बोलून केलेली पूजा, दान, ध्यानधारणा फळास येत नाही. असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

 

श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ, वाराणसीतर्फे वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वचनपर ते बोलत होते. याप्रसंगी ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य, औंधकर महाराज, खंडूशेठ चिंचवडे, विकास साने उपस्थित होते.

 

यावेळी प्रबोध परीक्षेतील जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी प्रथम पारितोषिक माधुरी पाटील (सोलापूर), जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी द्वितीय परितोषिक शुभांगी अरळीमार (सोलापूर), जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तृतीय परितोषिक विभागून चिन्मयी सोपल (बार्शी), शिवकन्या मल्लिकार्जुन दळवे (बार्शी) यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.

तसेच प्रविण परीक्षेतील जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी प्रथम पारितोषिक महात्मा हत्ते (परळी वैजनाथ), जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी द्वितीय परितोषिक सुभद्रा संकद (सोलापूर), जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तृतीय परितोषिक नूतन जंगम (मुंबई) यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.

महास्वामीजी पुढे म्हणाले की, ‘सा विद्या, या विमुक्तये’ म्हणजे विदयेमुळे संसारातून व्यक्ती मुक्त होतो. सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये अध्यात्मिक विद्या सर्वश्रेष्ठ आहे. त्याकरिता श्री काशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठाची स्थापना केली. आतापर्यंत सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून वीरशैव सिद्धांतांचा अभ्यास केला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संगीता जोशी व किशोर जोशी (भाळभोर) यांचा महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बलसुरे यांनी केले. सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर यांनी तर गुरुशांत रामपूरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चेतना गौरशेटे, राजशेखर बुरकुले, महेश स्वामी, रोहिणी स्वामी यांनी परिश्रम घेतले.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Students #Sinhagad #celebrated #RakshaBandhan #bytying #rakhyas #police #solapur, #सोलापूर #सिंहगड #विद्यार्थिनी #पोलिस #राख्या #बांधून #रक्षाबंधन #सण #साजरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जयंती, सण, उत्सव, निवडणूक पाहता तिघांना सोलापूर शहर – जिल्ह्यातून केले तडीपार
Next Article सोलापूर : कायमस्वरूपी शंभर फुट उंचीवर डौलाने फडकत राहणार तिरंगा ध्वज

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?