सोलापूर : महापालिकेच्या आवारात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या तब्बल शंभर फुटी उंच स्तंभावर आज दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. शानदार असा सोहळा देशभक्तीमय वातावरणात शनिवारी सकाळी नऊ वाजता पार पडला. Tiranga flag was hoisted on a hundred feet high flagpole in Solapur Municipal Corporation
“याची देही याची डोळा” उपस्थितांनी हा स्फूर्तीदायी सोहळा पाहिला. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण टिपला. पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकवणाऱ्या आणि 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या क्रांतिभूमी सोलापूर नगरीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवा इतिहास घडला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. याची जय्यत तयारी महापालिका प्रशासनाने केलीय. दरम्यान, हा अमृत महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या संकल्पनेतून महापालिका आवारात 100 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
या स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य दिव्य असा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आज शनिवारी सकाळी नऊ वाजता महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते दिमाखदार ध्वजारोहण सोहळा देशभक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी ढोल पथकाने बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ! यासह विविध देशभक्तीपर गीतांच्या तालावर अप्रतिम सादरीकरण केले. अग्निशामक दल प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या नेतृत्वाखाली दलाने शिस्तबद्धपणे सलामी दिली.
महापालिका आवारात “आय लव्ह सोलापूर” या सेल्फी पॉईंटच्या बाजूला दिमाखदार असा भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ आणि त्यामागे इंद्रभुवनची सुंदर इमारत असे डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळत आहे. महापालिका आवारात 100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वीतेसाठी सोलापूर महापालिका प्रशासनाची जंगी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर एक आगळावेगळा उत्सव व्हावा या उद्देशातून आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुट उंच स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात येणार आहे.
शंभर फुटी ध्वजस्तंभ उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने बनविलेला हा भव्य असा पांढऱ्या रंगाचा लोखंडी स्तंभ आहे. यामध्ये असलेल्या विद्युत मोटारच्या साह्याने ऑटोमॅटिकली ध्वजवर खाली करण्याची सोय उपलब्ध आहे. बाजूला 2 फोकसच्या प्रकाशात परिसर उजळणार आहे.
¤ काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती
■ ध्वज विद्युत मोटारीने वर चढवणार
■ ध्वजावर लाल दिवे असणार आहेत. कारण आकाशातील वाहतुकीस ते गरजेचे असते
■ २० बाय ३० फूट आकाराचा ध्वज असणार खर्च १३ लाख रुपये.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापूर : तिरंग्यातून साकारला भारतमातेचा भव्य १५० फुटांचा नकाशा
सोलापूर : आई प्रतिष्ठान आणि भू. म. पुल्ली कन्या प्रशाला यांच्यावतीने तिरंग्यातून भारतमातेचा भव्य १५० फुटांचा नकाशा काढला. हे दृष्य दिलखेचक होते. विद्यार्थिनींनी जल्लोषात तिरंगा रॅली काढली. शहरातील वातावरण देशभक्तीमय बनले होते.
भारत हमको जान से प्यारा सबसे प्यारा तिरंगा हमारा, भारत माता की जय, वंदे मातरम च्या जयघोषात हजारो विद्यार्थिनींची शुक्रवारी (ता. १२) तिरंगा रॅली निघाली. आई प्रतिष्ठान आणि भू. म. पुल्ली कन्या प्रशाला यांच्यावतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
साखर पेठ येथील पुल्ली कन्या प्रशालेत भारतमातेचे पूजन करून रॅली ची सुरुवात करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत तापडिया, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादूल, विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विजयकुमार गुल्लापल्ली, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, प्राणिता सामल, बाळकृष्ण गोटीपामुल उपस्थित होते.
साखर पेठेतून ही तिरंगा रॅली साखरपेठ, सोमवार पेठ, समाचार चौक, माणिक चौक, दत्त चौक, किल्ला बगीचा, सुभाष चौकमार्गे चार हुतात्मा पुतळा चौकात पोहचली. वाटेत ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन तिरंगा रॅलीचे जोरदार स्वागत केले.
तिरंगा रॅली पार्क मैदानावर आल्यावर भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी भारताच्या नकाशाच्या आकारात उभे राहून देशवासीयांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी ७५ आकडा ही विद्यार्थीनींच्या माध्यमातून तयार करण्यात आला. कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या सहाय्याने भारताचा नकाशा तयार केला.
यावेळी अश्विनी सहकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र घुली, नीलकंठ बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत तापडिया, रोशन भुतडा, मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सचिव योगेश डांगरे, उपाध्यक्ष सचिन हिरेमठ, राहुल डांगरे, योगेश डांगरे, सृष्टी डांगरे, वसंत जाधव, प्रताप महावरकर, विवेक नक्का, अविनाश शंकू, आशिष मिसाळ, परमेश्वर बाबळसुरे, बाळासाहेब गंभीरे, बालाजी लोकरे, हरीप्रसाद बंडी, अमोल गुंजकर, सचिन मुसळे, उमा कोटा, कलाकार विपुल मिरजकर आदी उपस्थित होते.