मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे. 2022 या वर्षांसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांच्या तपासांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2022 वर्षासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास’ पदक आज जाहीर केले आहे. Union Home Minister Medal awarded to 11 policemen in Maharashtra for outstanding performance in investigations
गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास’ पदक आज शनिवारी जाहीर करण्यात आले. यावेळी देशभरातील 151 पोलिसांना पदक मिळणार असून यामध्ये 11 राज्यातील पोलिसांचा समावेश आहे.
यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे 15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासित प्रदेशातून पोलीस आहेत. पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये 28 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2021 साली 152 पोलीस कर्मचार्यांना उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं प्रदान करण्यात आलं होतं. 2021 मध्ये हे पुरस्कार मिळालेल्या कर्मचार्यांमध्ये सीबीआयचे 15, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 11, उत्तर प्रदेशचे 10, केरळ आणि राजस्थान पोलिसांचे नऊ, तामिळनाडू पोलिसांचे आठ, बिहारचे सात, गुजरातमधील प्रत्येकी सहा पोलिसांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विविध गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरूवात 2018 वर्षीपासून करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
□ राज्यातील 11 केंद्रीय पदक विजेते पोलिस अधिकारी
1. कृष्णकांत उपाध्याय, , उपपोलीस आयुक्त
2. प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
3. मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
4. दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
5. अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
6. अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
7. राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
8. दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक
9. सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
10. जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
11. समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक