सोलापूर : भिवंडी, सोलापूर व ठाण्यातून तब्बल ११ ऑटोरिक्षा चोरणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने विजयपूर येथून अटक केली. नंबरप्लेट बदलून त्या रिक्षांची विक्री केल्याची बाब तपासात समोर आली आहे. Two arrested for stealing as many as 11 autorickshaws, performance of crime branch, Solapur
या प्रकरणी सलीम मेहबूबसाब मुल्ला व मुश्रीफ मकबुल नदाफ (दोघेही रा. विजयपूर, कर्नाटक) व मलंग बागवान (रा. केशवनगर, मौलाली चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील मलंग महमद बागवान हा या गुन्ह्यातील मास्टरमाइंड असल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली आहे. मलंग हा स्वत: रिक्षाचालक आहे. त्याने दहा ऑटोरिक्षांची विक्री सलीम व मुश्रीफला केली होती.
दुचाकीसोबतच ऑटोरिक्षांची चोरी शहरात वाढल्याने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी गुन्हे शाखेला चोरट्यांचा शोध तत्काळ घेण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या पथकाने ऑटोरिक्षा चोरीचा अभ्यास केला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली आणि १५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी विजयपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून ऑटोरिक्षा चोरीत सोलापुरातील मलंग हा सूत्रधार असल्याची बाब समोर आली.
ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार दिलीप भालशंकर, पोलिस नाईक योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे, वसीम शेख, अमित रावडे, विजय वाळके, श्रीकांत पवार, राहुल तोगे, गणेश शिंदे, बापू काळे, सतीश कोटे यांच्या पथकाने केली. या तपासात सायबर सेलची मोठी मदत पोलिसांना झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ अल्पवयीन भाचीवर मामाने केला अत्याचार; भाची गरोदर
पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असलेचा फायदा घेत, तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी बळजबरीने संभोग केला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.
त्या प्रकरणी आरोपी चुलत मामाच्या विरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घडला प्रकार कोणाला सांगितल्यास मुलीला आणि तिच्या आईला मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत करकंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गेल्या सहा ते सात महिन्यापूर्वी पीडितेच्या राहत्या घरी जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती संभोग केला. त्यानंतर पीडितेच्या आईने तिची सोनोग्राफी केल्यानंतर केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
यातील आरोपी हा फिर्यादीचा नात्याने चुलत भाऊ असून तो फिर्यादीच्या घराजवळ राहण्यास आहे. त्याने वरील तारखेस फिर्यादीची अल्पवयीन मुलगी कुमारी निर्भया ही घरामध्ये एकटी असताना तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे बळजबरीने शरीर संभोग केला आहे. त्यातून पीडित मुलगी ही गरोदर झालेली आहे व आरोपीने पीडित मुलीला कोणाला काही सांगितले तर तुला व तुझे आईला मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीवर बलात्कार आणि बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक केली नसून त्याचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि निलेश तारू करत आहेत.