मुंबई : शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. Gift of Shinde government, will get 3 percent dearness allowance
उद्यापासून राज्य सरकारची पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची म्हत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाची निर्णय घेण्यात आले. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होणार आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत होते. मुख्यमंत्री राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 3 टक्के वाढ आधी 31 टक्के होता आता 34 टक्के होणार. ऑगस्टपासून ही वाढ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा केलीय.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून केंद्राप्रमाण महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती. त्यामुळं आता मुख्यंत्र्यांनी ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. त्यामुळं आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्क्यांवर गेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथील पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/rQe7dlysGi
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 16, 2022
या महागाई भत्त्याची अंमलबजावणी याच ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. केंद्र सरकारनं १ जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्त वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनी देखील ३ टक्के महागाई भत्त्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी आंदोलनंही झाली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.
□ महाराष्ट्रात उद्या सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन
#महाराष्ट्र #Maharashtra #राष्ट्रगीत #आवाहन #surajyadigital #सुराज्यडिजिटल
राज्य सरकारने उद्या (17 ऑगस्ट) सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले आहे. यासाठी उद्या आहे त्या ठिकाणी थांबून सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत म्हणावे, असे स्पष्ट करण्यात आले. यासंबंधी परिपत्रक काढण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
》 बस आणि तेल टँकरचा अपघात; 20 जण ठार
वृत्तसंस्था : पाकिस्तानमधून वेदनादायक रस्ता अपघाताची बातमी समोर आली आहे. लाहोरहून कराचीला जाणारी बस आणि तेल टँकर यांच्यात झालेल्या धडकेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. बस ऑईलने भरलेल्या टँकरला धडकल्याने हा अपघात झाला. टक्कर होताच टँकर आणि बसला आग लागली आणि 20 प्रवासी जिवंत जळाले. जळालेल्या 6 प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यात आले जेथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुलतान सुक्कूर मोटरवेवर पहाटे हा अपघात झाला. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली मात्र अपघातातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यात अपयश आले. या घटनेची पुष्टी करताना मुलतानचे उपायुक्त ताहिर वाटू यांनी सांगितले की, लाहोरहून कराचीला जाणारी बस जलालपूर पिरवालाजवळ तेलाच्या टँकरला धडकली, त्यामुळे हा मोठा अपघात झाल्याने जीवितहानी झाली.