Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरातील एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यास जीवे मारण्याची धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

पंढरपुरातील एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यास जीवे मारण्याची धमकी

Surajya Digital
Last updated: 2022/08/18 at 10:38 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल□ सोलापूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांची होणार चौकशीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : पंढरपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश साठे यांना खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पंढरपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घडलेली घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याची माहिती महेश साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Bhalke Kale threatened to kill the leader of Eknath Shinde group in Pandharpur

खुनातील फरार आरोपी परमेश्‍वर देठे यांनी फोन करून आपणास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप साठे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

दोन आठवड्यापूर्वी तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यामध्ये सतरा पैकी सात जागेवर परिचारक गटाने, साठे यांनी चार जागेवर तर भालके-काळे गटाने सहा जागांवर विजय मिळवला होता. महेश साठे यांनी आपल्याच कुटुंबातील पाच जणांना उमेदवारी देत चार जणांना विजयी केले. दरम्यान साठे यांनी स्वतंत्र आघाडी उभा केली असली तरी निवडणुकीपूर्वी त्यांनी भालके व काळे गटाशी हातमिळवणी केली होती.

यामुळेचे भालके – काळे गटाच्या उमेदवारांविरोधात त्यांनी आपले उमदेवार दिले नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर भालके – काळे व साठे यांची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र सरपंचपद खुले असल्याने यावरून वाद सुरू झाला. भालके
– काळे गटाने साठे यांना विश्‍वासात न घेता परिचारक यांच्याबरोबर सरपंचपदासाठी बोलणी केली असल्याचा आरोप साठे यांनी यावेळी केला.

 

 

मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही. यानंतर साठे यांनी भालके-काळे गटाशी फारकत घेत थेट परिचारक गटाशी युती केली. साठे यांचे बंधू संजय साठे यांना उपसरपंचपद देण्यात आले तर परिचारक गटाच्या विजयमाला वाळके यांना सरपंचपदी संधी मिळाली.

याचा धक्का भालके – काळे गटाला बसला. या गटाचे परमेश्‍वर देठे यांनी महेश साठे यांना अनोळख्या मोबाईल क्रमांकावरून फोन करीत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे परमेश्‍वर देठे व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर मागील महिन्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी देठे फरार असताना देखील पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महेश साठे यांनी देठे याच्या विरोधात गुन्हा केला असल्याची माहिती दिली.

तसेच आमदार शहाजी पाटील यांना याविषयी सर्व माहिती दिली असून ते पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. साठे हे मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबई येथे भेट घेवून आरोपीस अटक करण्याची व संरक्षण मिळावे अशी मागणी करणार असल्याचेही म्हटले आहे.

 

□ सोलापूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांची होणार चौकशी

सोलापूर : सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कैलास आढे, पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी आश्रमशाळांना बेकादेशीरपणे अनुदान वाटप प्रकरणी चौकशी करण्यासाठी उपायुक्त भगवान वीर यांची नियुक्ती केली आहे.

कैलास आढे हे किसन पाटील या शिपायामार्फत कोट्यावधीतचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप  सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांनी केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आले होते.

या प्रकरणाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Bhalke #Kale #threatened #kill #leader #EknathShinde #group #Pandharpur, #पंढरपूर #एकनाथशिंदे #गट #नेत्यास #जीवे #मारण्याची #धमकी #भालके #काळे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांची होणार चौकशी
Next Article खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सोडली पुडी, राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांमागे लागणार ईडी 

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?