पुणे : राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सबंध भारतासाठी ऊर्जास्रोत असलेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर आज सकाळी राज्यपालांनी भेट दिली. तब्बल २० वर्षांनी पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल हे शिवनेरी किल्ल्याच्या दौऱ्यावर आले आहेत. प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले, यानंतर संपूर्ण गडाची पाहणी देखील केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या ७९ वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशा पद्धतीनं पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांनी पायीच हा गड सर केल्याने सर्वच जण चकित झाले आहेत. यावेळी ‘यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है,’ असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटल्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवनेरीला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेतलं. तत्पूर्वी राज्यपालांनी पायीच हा गड सर केला. त्याचवेळी आतापर्यंत राज्याचे कोणतेच मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर पायी चालत आले नाहीत.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, “शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत.” शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे लक्ष जाते, असं म्हणत शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे तान्हाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचीही आठवण कोश्यारी यांनी काढली.
“शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत.”
– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल