Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकलासपूरजवळ कार – दुचाकीचा अपघात, दोन ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

एकलासपूरजवळ कार – दुचाकीचा अपघात, दोन ठार

Surajya Digital
Last updated: 2022/08/23 at 2:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कार अपघातात चिमुकली मुलीसह महिला जागीच ठार ; पाच जण गंभीर जखमी□ पाणी समजून केले कीटकनाशकाचे प्राशन

सोलापूर : पंढरपूर – मंगळवेढा मार्गावरील एकलासपूरजवळ कार आणि मोटार सायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील  २ जण ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री घडला. अपघाताचे वृत्त समजताच मंगळवेढा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

अपघातात मयत झालेले दोघेही मंगळवेढा येथील आहेत. आण्णासाहेब दत्तात्रय सावंजी (वय २२ वर्षे) आणि विजय दादासाहेब सावंजी (वय २२ वर्षे ) हे दोघे त्यांच्या मोटार सायकलवरून पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे जात होते.

एकलासपूरजवळ मंगळवेढ्याकडून येणाऱ्या कारसोबत मोटार सायकलची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ कार अपघातात चिमुकली मुलीसह महिला जागीच ठार ; पाच जण गंभीर जखमी

 

सोलापूर : सोलापूर – पुणे महामार्गावर पुण्याकडे निघालेल्या होंडा सिटीकार विरुद्ध दिशेला पलटी खात जाऊन सोलापूरकडे निघालेल्या इनोव्हा कार व कंटेनरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक विवाहित तरुणी जागीच मयत झाली. तसेच एक चिमुकली मुलगी मयत झाली तर पाचजण जखमी झाले.

 

हा अपघात काल सोमवारी (ता.22) दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास भोइंजे पाटीजवळ (ता.माढा) येथे घडला. होंडा सिटी कार (क्र. एम. एच-१२आर. के – ४७५४) ही कार पुण्याकडे निघाली होती. या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरून पलटी होत विरुद्ध दिशेला गेली. नंतर ती सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरला (क्र-एम.एच-१२ टी.व्ही-६५७८) व इनोव्हा कारला (क्र-एम.एच.१३-ए.झेड-२५२९) धडकली.

या अपघातात माधुरी मल्लिनाथ चितकोटी (वय-३०, रा.सोलापूर ) ही जागीच मयत झाली. तर सानवी मयूर पाटील (वय-७ ) ही पंढरपूर येथे उपचारा दरम्यान मयत झाली. तसेच मयूर मल्लिनाथ पाटील (वय-३३),संगीता मयूर पाटील (वय-३०) व मीरा मल्लिनाथ चितकोटी (वय-३) तसेच एनोव्हा कारमधील सलीम सय्यद (वय-३०) व दिलीप गायकवाड (वय-७०, सर्वजण रा.सोलापूर ) हे जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी पंढरपूर येथे व किरकोळ जखमींना टेंभुर्णी येथे दाखल केले. या अपघातात होंडा सिटी कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघात समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील एएसआय अभिमान गुटाळ,पोहेकॉ मकबूल तांबोळी,पोकॉ प्रसाद काटे व हायवे स्टाफच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना उपचारास पाठविले.

 

□ पाणी समजून केले कीटकनाशकाचे प्राशन

 

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंगरूळ येथे निपाणी विजय फडतरे (वय- 28, राहणार अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर ) हिने डोकेदुखीची गोळी खाऊन त्यावर पाणी समजून कीटकनाशकाचे मिश्रण  करून ठेवलेले पाणी प्राशन केले. नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला उपचारासाठी पती विजय फडतरे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सिव्हील हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #pandharpur #Car-bike #accident #near #Eklaspur #two #killed, #एकलासपूर #पंढरपूर #कार #दुचाकी #अपघात #दोन #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विनायक मेटेंच्या अपघातानंतर आमदारांच्या वाहनचालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय
Next Article शिंदे – ठाकरे संघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे; गुरुवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका – कोर्ट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?