सोलापूर : उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील इतर साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहापासून या कारखान्यांची झाडाझडती सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात मोठी कारवाई सुरु आहे. आज महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकल्याचे वृत्त आहे. Dhadsatra: Income Tax Department raids on two entrepreneurs in Solapur
अभिजीत पाटलांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं पाठबळ असल्याची चर्चा होती. या बड्या नेत्याला या कारवाईतून लक्ष्य केलं जात असल्याचंही बोललं जातंय. अभिजीत पाटील पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. या उद्योजकाने काही वर्षातच राज्यातील 4 खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला आहे.
चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरू आहे. अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या १० वर्षात ओळखले जात आहेत.
धाराशीव साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद), धाराशीव साखर कारखाना युनिट २ (लोहा, नांदेड), वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड, नाशिक,सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना (पंढरपूर, सोलापूर) हे चार कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. आता विठ्ठल सहकारी साखर कारखानाही ताब्यात आला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकहाती जिंकल्याने हाही कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत २१ पैकी २० जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते. ते विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत. त्यांच्या ताब्यात ५ कारखाने आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.
धाराशिव साखर कारखाना , चोराखडी , उस्मानाबाद धाराशिव साखर कारखाना , युनिट २ , लोहा नांदेड, वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी , चांदवड नाशिक या तीन खाजगी साखर कारखान्यावर व पंढरपुरातील डीव्हीपी समूहाचे कार्यालय, त्यांच्या निवासस्थानी धाडी सुरू आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी
सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी सूरु आहेत. आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. राज्यातील 24 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत.
आज महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिजीत पाटील यांच्या चार खासगी साखर कारखान्यावरही धाडी टाकल्या आहेत. सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या कार्यालयावर देखील छापेमारी केली आहे.
आयकर विभागाचे पथक सोलापुरातील व्यवसायिकाच्या कार्यालयावर सकाळपासून चौकशी करत आहे. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागामध्ये मुंबईचे, नागपूरचे पथक सामील आहे. तसेच नाशिकचे पथक देखील दाखल झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकारी देखील झालं आहे. छोटो मोठे व्यवसायिक देखील आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.