Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनसेने आपल्या घोषवाक्यात केला बदल; मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मनसेने आपल्या घोषवाक्यात केला बदल; मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक

Surajya Digital
Last updated: 2022/08/25 at 5:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला नव्याने उभं करण्यासाठी कंबर कसली आहे. आजपासून मनसेने राज्यभरात सदस्य नोंदणीला अभियानाचा बिगुल फुंकला आहे. यात मनसेने आपल्या घोषवाक्यात बदल केलाय. आता याचा मनसेला फायदा होणार की तोटा हे येणारा काळच ठरवेल.  MNS changed its slogan; I am Hindvi Rakshak, I am Maharashtra Sevak Raj Thackeray

याची सुरूवात पुण्यातून केली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची वाट धरली आहे. त्यांनी अजान-हनूमान चालिसा, भोंगे इत्यादी मुद्यावरून राज्यातील वातावरण तापवले होते. त्यांच्या बदलत्या भूमिकेचे प्रतिबिंब असलेले नवं पोस्टर शेअर केले आहे. मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाची जोड दिली आहे.

आता भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान, असं नमूद केलेलं पोस्टर पुढे आले आहे. यावर राज ठाकरेंचा हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक, असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, हे मनसेचं नवं घोषवाक्य देण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांनी, मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक हे घोषवाक्य ही जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे आता मुंबईसह राज्यभरात मनसेची सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. त्याआधिच या घोषवाक्याचे रात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर पहायला मिळत आहेत. तर राज ठाकरे गणेश उत्सवानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत अशीही माहिती मिळत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. नेहमी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर आक्रमकपणे लढणारी राज ठाकरेंची मनसे आता मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक या नव्या घोषवाक्य देणार आहे.

2014 मध्ये मनसेचा राजकीय प्रवासासह स्पर्धा पाहता मागे पडला आहे. यानंतर आता मनसेने मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत राजकारणात पुन्हा आक्रमक पद्धतीने सक्रिय झाली, यात हिंदुत्वाचा मुद्दाही मनसेने आता लावून धरला आहे. यात आता नव्या घोषवाक्यातून मनसेने मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड दिली आहे. त्यामुळे मनसेची पुढील राजकीय भूमिका यातून स्पष्ट झाली आहे. या मुद्द्यावरून मनसे आता पुन्हा राजकारण आक्रमकपणे सक्रिय होण्यास सज्ज झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेत आता बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. नुकतचं मुंबईत सलग दोन दिवस त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळाव्यांना हजेरी लावली. यात आता राज ठाकरे पुण्यात जाणार आहे. पुण्यातून ते मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा नारळ फोडत आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यभरात मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेने ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ हे नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. यापूर्वी मनसेने पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरेंनी ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ हे घोषवाक्य जाहीर केलं होतं. आता यात बदल केलाय.

 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #MNS #changed #slogan #Iam #HindviRakshak #Maharashtra #Sevak #RajThackeray, #राजठाकरे #मनसे #घोषवाक्य #बदल #हिंदवी #रक्षक #महाराष्ट्र #सेवक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धाडसत्र : सोलापुरातील दोन उद्योजकावर आयकर विभागाचे छापे
Next Article रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने ‘सही रे सही’ ला वीस वर्ष पूर्ण, केक कापून कौतुक

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?