Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूरजवळ एसटी बस – ट्रकचा अपघात; दोन ठार, सहा जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूरजवळ एसटी बस – ट्रकचा अपघात; दोन ठार, सहा जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/08/25 at 9:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : पंढरपूरहून आटपाडीकडे जाणारी एसटी बसला पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून सहाजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. Sonke ST bus-truck accident near Pandharpur; Two killed, six injured

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ शेतीच्या वादातून झोपेत असलेल्या सख्या भावावर हल्ला: दोघांवर गुन्हा

हा अपघात सोनके येथे आज गुरूवारी (ता.25) सकाळी १२ च्या सुमारास झाला. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात बस मधील सुंदराबाई माने ( वय: 69 रा.फळवणी ता.माळशिरस) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. दुस-या मयताचे नाव समजू शकले नाही. प्रवासी शंकर शिवशेटे, बस चालक आनंदराव पाटील, बस वाहक राजेंद्र गायकवाड हे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंढरपूरहून आटपाडीकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या व एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिस दलाचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविले. मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. त्यात अनेकांचा जीव जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ शेतीच्या वादातून झोपेत असलेल्या सख्या भावावर हल्ला: दोघांवर गुन्हा

 

सोलापूर – शेत जमिनीच्या वाटणीच्या बाबत तू कोर्टात का गेला? या कारणावरून झोपेत असलेल्या सख्ख्या भावावर लोखंडी अँगलने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना दहिटणे (ता.बार्शी) येथे काल बुधवारी (ता.24) पहाटेच्या सुमारास घडली.

प्रवीण चंद्रकांत काशीद (वय ३६ रा. दहिटणे) असे जखमीचे नाव आहे. त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ हरिदास काशीद आणि तुकाराम दत्तात्रय साठे (दोघे रा. दहिटणे)या दोघांवर वैरागच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जखमी प्रवीण काशीद हे आपल्या शेतातील वस्तीवर झोपले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास हरिदास काशीद आणि तुकाराम साठे या दोघांनी शेतीचा वाद कोर्टात का घेऊन गेला. या कारणावरून त्याच्यावर लोखंडी अँगलने हल्ला करून हात फ्रॅक्चर केला. तसेच आई लता काशीद यांना शिवीगाळ आणि धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार हळे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Sonke #STbus #truck #accident #Pandharpur #Twokilled #sixinjured, #पंढरपूर #सोनके #एसटीबस #ट्रक #अपघात #दोनठार #सहाजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने ‘सही रे सही’ ला वीस वर्ष पूर्ण, केक कापून कौतुक
Next Article पंढरपूर, सोलापुरात आयकर विभागाच्या धाडी, पथक रात्री मुक्कामी असल्याची माहिती

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?