पंढरपूर : सूरज सरवदे
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात दिवंगत आमदार भारत भालके आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पण त्यात यश आले नाही. ते त्यांना जमले नाही ते आमदार समाधान आवताडे यांनी करून दाखवले. What the Bharat Bhalke Prashant attendants could not do, the Pandharpur Mangalvedha was shown by the satisfaction
मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा पाणी प्रश्न गेल्या 25-30 वर्षांपासून रेंगाळत राहिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 35 गावाचे पाणी हा कळीचा मुद्दा होता. राज्यात सत्तांतर झाले आणि आमदार समाधान अवताडे यांनी घेतलेल्या 23 गावच्या पाणी प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन झाल्यानंतर 7 दिवसात मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती बदलली जाणार आहे. कायमस्वरूपी दुष्काळी 35 गावातील 11 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्यात येत आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांनी मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर त्यांनी 35 गावच्या पाण्याचा प्रश्न हाती घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून अथक परिश्रमानंतर 2014 च्या विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या तोंडावर योजनेला मंजुरी आणली होती. मात्र सत्तांतर झाले भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर 35 गावच्या योजनेसाठी काहीच झाले नाही.
भाजपची सत्ता असताना आमदार प्रशांत परिचारक विधानपरिषदेवर आमदार झाले. भालके – परिचारक दोघेही आमदार असताना पाणी प्रश्नावर तोडगा निघाला नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना – राष्ट्रवादी- काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा स्व आमदार भारत भालके यांनी प्रयत्न केले. आमदार भारत भालके यांना कोरोना झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भारत भालके यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 35 गावची योजना मार्गी लावणे हीच भारत नाना भालके यांना श्रद्धांजली ठरेल, असे उदगार काढल्यानंतर महाविकास आघाडी योजनेला मान्यता देणार असे वाटत होते. मात्र स्व भारत भालके यांच्या निधनाला एक वर्षांहून अधिक काळ गेल्यावरही योजनेला मान्यता मिळाली नाही.
सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार समाधान अवताडे यांनी दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरू देऊ नका, असे भावनिक साद घातल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन झाल्यानंतर 23 गावच्या योजनेला मान्यता देणार आणि योजनेला निधी उपलब्ध करून देणार असे अधिवेशनात सांगितल्यामुळे मंगळवेढ्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटणार असल्याचे चित्र आहे.
समाधान अवताडे यांनी आमदार होऊन दीड वर्षाच्या कालावधीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे 23 गावची योजना लवकरच मार्गी लागण्यास मदत झालीय.
https://facebook.com/100063854901232/posts/pfbid0w3fQYiZsQ1CSE2NZrDYAmLhu2eEK41XkMVrWRZtd3iw5fExehKr9ZVy6xt1jahmbl/