वृत्तसंस्था : भारतीय वंशाचे मात्र अमेरिकेत असलेले रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक गोष्टींबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाकडून या प्रकरणी या तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावण्यात आले आहे. A case has been filed against Prime Minister Narendra Modi, Chief Minister Reddy, businessman Gautam Adani in the US
एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने भ्रष्टाचार आणि पेगासस स्पायवेअरसह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि पेगासस स्पायवेअरसह अनेक मुद्द्यांवर खटला दाखल केला.
भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने हा गुन्हा दाखल करण्याचा कारनामा केला आहे. कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातील भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं हा आरोप केलाय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, पेगासस स्पायवेअरचा वापर आणि इतर मुद्द्यांवर खटला दाखल केला आहे.
न्यूयॉर्कमधील प्रख्यात भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी याला ‘डेड ऑन अरायव्हल खटला’ असे म्हटलय. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाने या सर्व नेत्यांसह इतर अनेकांना समन्स जारी केले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
24 मे रोजी खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले. त्यांना 4 ऑगस्ट रोजी भारतात आणि 2 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील श्वाब यांना समन्स बजावण्यात आले. डॉ वुय्यूरू यांना १९ ऑगस्ट रोजी समन्स सादर केल्याचा पुरावा सादर करण्यात आला.
मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरुद्ध हा खटला रिचमंड येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ लोकेश वुय्यूरू यांनी दाखल केला आहे. खटल्यात नाव असलेल्या इतरांपैकी प्रोफेसर क्लॉस श्वाब, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरने आरोप केला की, मोदी, रेड्डी आणि अदानी आणि इतर लोक भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ज्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअरचा वापर समाविष्ट आहे.
□ गर्भवती भारतीय महिलेचा पोर्तुगालमध्ये मृत्यू, आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा
भारतीय महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. या महिलेने एका मुलाला जन्म दिला. परंतु, हृदयविकाराच्या झटक्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यानंतर पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांचा राजीनामा घेतला. दरम्यान, मार्टा टेमिडो या 2018 पासून देशाच्या आरोग्य मंत्री होत्या आणि त्यांनी कोरोनादरम्यान देशात अत्यंत चांगलं काम केल्याचं बोललं जात आहे.