सोलापूर : भारतीय जनता पक्षाने आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांना घेऊन जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे सहकार्य आवश्यक आहे आणि ते आपल्याला मिळेलच अशी आशा नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली. Solapur district will make BJP 100%: BJP district president Kalyanshetty
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी बोलत होते. ते म्हणाले, पक्षाच्या संघटनेपासून सरपंच ते आमदारकी असा माझा प्रवास आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी दखल घेतल्यानेच मी आमदार झालो आणि आता जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनीच दिली आहे. शहाजी पवार यांच्यानंतरच त्यांनी आपल्याला जिल्हाध्यक्षपद घेण्यास सांगितले होते.
मात्र मतदारसंघ मोठा असल्याने आणि आपण नवीन असल्याने मी त्यास नकार दिला. मात्र आता दुसऱ्यांदा त्यांनी सांगितल्याने आपण त्यांना नाही म्हणू शकलो नाही. यापूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता तो भाजपचा बालकिल्ला बनला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
जिल्हात भाजपचे हेच अस्तित्व कायम टिकवून ठेवत आगामी काळात पक्ष, संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, यावर आपण काम करणार आहे. आगामी सर्व निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपची सत्ता राहील, वसा दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. भाजपमध्ये सोलापूर शहर असो वा अक्कलकोट शहर असो कोणतीही गटबाजी नाही. सर्वजण पक्षाचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहेत, असेही सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.
□ मंत्रिपदावर कधीही दावा केला नाही
जिल्हाध्यक्ष पद पदरी टाकून पक्षाने मंत्रीपदाच्या रेसमधून बाहेर काढले का? या प्रत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले की, पक्षाने मला भरभरून दिले आहे. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर मी मंत्रीपदावर कसा दावा करू शकतो? मला मंत्रिमंडळात घ्यावे, यासाठी मी आजपर्यंत कोणालाही भेटलो नाही. पक्षातील माझे काम पाहून पक्षाने मला नव्याने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यातच मला आनंद आहे. आगामी काळत पक्ष सांगेल ती जबाबदारी मी स्वाकारायला तयार आहे.
□ यंदाही दोन मंत्रिपदे मिळतील
१९९५ साली भाजप-सेना युतीचे सरकार असताना सोलापूर जिल्ह्याला दोन मंत्रिपदे होती. २०१४ मध्ये भाजपचे सरकार असतानाही दोन मंत्रिपदे होती. त्यामुळे भाजपचे सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष कायम आहे, हे सिध्द होते. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळातही जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळतील, अशी आशा आहे. तशी आपण वरिष्ठांकडे मागणीही करणार असल्याचे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले.