नवी दिल्ली : भारतीय नौदलाचा नवीन ध्वज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सादर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना हा ध्वज अर्पण करण्यात आला आहे. ‘या ध्वजावरून गुलामीची निशाणी आज उतरवण्यात आली आहे, शिवरायांनी नौदलाचा विकास सर्वात आधी केला, त्यांनी सामर्थ्यशाली नौदल उभारले होते, नवीन ध्वज प्रेरणा देईल’, असे मोदी म्हणाले. मोदींच्या हस्ते आज पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत ही युद्धनौका नौदलात सामील झाली आहे. Vikrant presents the new flag of the Navy to Chhatrapati Shivaji Maharaj
भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा नवीन नौदल चिन्हाचे (निशान) अनावरण करतानाचा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण.
भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आतापर्यंत गुलागिरीचं निशाण होतं. पण आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारं काम आपण केलंय. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झेंड्यावरुन पुसून टाकलंय. आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. तो झेंडा आपण नौदलाचे प्रणेते छत्रपती शिवरायांना समर्पित करतो आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या युद्धनौकेत 2300 कंपार्टमेंट असून या युध्दनौकेची लांबी 262 मीटर, उंची 59 मीटर आणि रूंदी 62 मीटर आहे. याचे वजन सुमारे 45 हजार टन आहे. यासाठी 20 हजार कोटी रूपये निर्मिती खर्च आला आहे. यामुळे 1500 रोजगार निर्मितीची शक्यता आहे. युध्दनौकेवरून एकाचवेळी 12 फायटर प्लेन आणि 6 हेलिकॉप्टर उडवता येतात. येथे 2 ऑपरेशन थिएटर आणि एक लॅब आहे. या जहाजावर 30 फायटर प्लेन आणि हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे.
देशाची पहिली विमानवाह युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात आज सामील झाली आहे. केरळमधील कोची येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात आयएनएस विक्रांत युद्धनौकेचं महत्त्व पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत जगातील त्या देशांमध्ये सामील झाला आहे, जे देश स्वदेशी तंत्रज्ञानाने एवढी मोठी विमानवाहू युद्धनौका तयार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नौदलातील योगदान अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, सागरी शक्तीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नौदल उभारलं, ज्याने शत्रूंची झोप उडवली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणाऱ्या व्यापाराच्या ताकदीचा धाक होता. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आता छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आजपासून नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात फडकणार आहे.