Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा : अमित शहा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा : अमित शहा

Surajya Digital
Last updated: 2022/09/05 at 4:32 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याला काही प्रमुख राजकीय अर्थ देखील सांगितले जात आहेत. देशातील सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे फडणवीस यांचे मिशन आहे. सोबतच येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या 18 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. Show Uddhav Thackeray his place: Amit Shah Union Home Minister Mumbai tour

Contents
□ ‘केवळ 2 जागांसाठी शिवसेनेने…’; अमित शहांचा गौप्यस्फोटस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अमित शहा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले…

 

□ ‘केवळ 2 जागांसाठी शिवसेनेने…’; अमित शहांचा गौप्यस्फोट

 

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांची येथे मेघदूत बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली आहे. यामध्ये त्यांनी एक खुलासा केला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत केवळ 2 जागांसाठी शिवसेनेने भाजपशी युती तोडली आहे, असा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसेच शहा यांनी आगामी मुंबई महानगर पालिकेत 150 जागा जिंकायचे टार्गेट ठेवले आहे.

 

गृहमंत्री अमित शहा काल रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले आणि आता ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर सक्रिय झाले आहेत. ते आज पहाटे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याशिवाय इतर अनेक नेते उपस्थित होते. अमित शहा यांनी पत्नी आणि नातवासोबत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

गृहमंत्री अमित शहा सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले. यादरम्यान शहा यांनी शिंदे यांच्या घरी गणेशोत्सवाला हजेरी लावली. तसेच गणपती बाप्पाची पूजा केली. अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी लालबागचा राजा पंडाल येथे पूजा केली. प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. येथून शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचून गणेश पूजेला हजेरी लावली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

राजकारणात कोण कधी कोणाविरोधात जाईल सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडून आघाडी जवळ केली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यावर अमित शहांचा रोष आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत, अमित शाह यांनी “उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा, राजकारणात काहीही सहन करा पण धोका नाही. मुंबईत भाजपचेच वर्चस्व हवे” असे वक्तव्य केले आहे.

 

वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

 

अमित शहा यांच्या दौऱ्याला काही प्रमुख राजकीय अर्थ देखील सांगितले जात आहेत. देशातील सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे फडणवीस यांचे मिशन आहे. सोबतच येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या 18 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

 

● अमित शहा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले…

* राजकारणात धोका देणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मैदानात येणे गरजेचे.

* आगामी मुंबई महानगर पालिकेत आपल्याला 150 जागा जिंकायच्या आहेत.

* उध्दव ठाकरेंना जागा दाखवायची वेळी आली आहे.

* भाजपने कधीही मोठा भाऊ- छोटा भाऊ म्हटले नाही..

* महाराष्ट्रातील हिंदू विरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे.

You Might Also Like

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नांदेड गुरुद्वारास भेट

TAGGED: #Show #UddhavThackeray #place #AmitShah #UnionHomeMinister #Mumbai #tour, #उद्धवठाकरे #जागा #दाखवा #अमितशहा #केंद्रीयगृहमंत्री #मुंबई #दौरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टुडे ब्लॉगज : जीवनात शिक्षकाचे महत्व, पण शिक्षकांसमोरील मोठी समस्या….
Next Article भाजपमधील ‘इनकमिंग’ वर अशोक निंबर्गीनी घेतले पक्षावर तोंडसुख राजकीय

Latest News

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?