Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपमधील ‘इनकमिंग’ वर अशोक निंबर्गीनी घेतले पक्षावर तोंडसुख राजकीय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

भाजपमधील ‘इनकमिंग’ वर अशोक निंबर्गीनी घेतले पक्षावर तोंडसुख राजकीय

Surajya Digital
Last updated: 2022/09/05 at 5:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कोणत्याही गटात रहा, कटात नको□ मोठा झटका – रेल्वेचं तिकीट रद्द करण्याआधी ही बातमी वाचा

सोलापूर : आगामी निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना तिकिटे देण्यापेक्षा वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीचे निः स्वार्थपणे काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्ये तिकिटे द्यावीत, अशी अपेक्षा भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी व्यक्त केली. Ashok Nimbergini took a political dig at the party on ‘Incoming’ in BJP

 

यावेळी जाहीर कार्यक्रमात सुरेश पाटील यांनी निंबर्गी यांची जाहीर माफी मागत माझ्यावर विषप्रयोग करणाऱ्यांपैकी ते नसल्याचा खुलासा केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनीष देशमुख यांचा सत्कार शनिवारी विजयपूर रस्त्यावरील मयूर मंगल कार्यालय येथे करण्यात आला. त्यावेळी प्रा. निंबर्गी बोलत होते.

देशात एक काळ असा होता की काँग्रेसच्या तिकिटावर कोणालाही उभे केले तर तो व्यक्ती निवडून येत असे. आता तशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीची देशभरात आहे. असे असताना बाहेरून आलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तिकीट देऊन निवडून आणण्यापेक्षा कोणताही स्वार्थ अपेक्षांना ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गणपा, मोहन डांगरे, हणमंत कुलकर्णी, चनगोंडा हविनाळे, सरचिटणीस शशी थोरात, माजी उपमहापौर राजेश काळे, अमर बिराजदार, संतोष भोसले, भटके विमुक्त विकास आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, दीपक जाधव, संयोजक महेश देवकर, अक्षय अंजिखाने, विशाल गायकवाड, दैदिप्य वडापूरकर, सागर अतनुरे, मधुसूदन जंगम आदी उपस्थित होते.

□ कोणत्याही गटात रहा, कटात नको

प्रा. अशोक निंबर्गी हे माझे जवळचे मित्र आहेत. माझ्यावर विषप्रयोग करणाऱ्यांपैकी ते नाहीत. अनावधानाने मी त्यांच्यावरती आरोप केले. मी त्यांची जाहीर माफी मागतो अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांची या कार्यक्रमात जाहीर माफी मागितली. मात्र प्रा. निंबर्गी यांनी ‘कोणत्याही गटात रहा पण कटात राहू नका’ या एका वाक्यातच त्यांच्या बोलण्याला उत्तर दिले.

 

 

□ मोठा झटका – रेल्वेचं तिकीट रद्द करण्याआधी ही बातमी वाचा

 

रेल्वेने तिकिटांबाबत नियम आणण्याचा विचार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसू शकतो. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, कन्फर्म तिकीट रद्द केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे. आधीच कन्फर्म तिकीट रद्द केलं तर आपल्याला काही शुल्क द्यावे लागतच होते. परंतु आता यावर लोकांना जीएसटी करही लागू होणार आहे.

You Might Also Like

दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा

सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते

मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे

सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

TAGGED: #AshokNimbergini #took #political #dig #party #Incoming #BJP, #सोलापूर #भाजप #इनकमिंग #अशोकनिंबर्गी #पक्ष #तोंडसुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा : अमित शहा
Next Article पंढरपुरात लवकरच 200 खाटांचे सामान्य रुग्णालय : आरोग्य मंत्री सावंत

Latest News

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?