मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे, 26 सप्टेंबरला विस्तार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. शिंदेंनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन ठेवले होते. यावेळी त्यांनी ही तारीख सांगितल्याची माहिती आहे. The date of cabinet expansion has been decided, the swearing-in ceremony will be held on the Patripaksa fortnight
दुसरा शपथविधी कधी होणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मात्र आता पितृपक्ष संपल्यावर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नवरात्र उत्सवामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेदिवशी, 26 सप्टेंबर विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी वर्षा निवासस्थानी बोलावले होते. यावेळी अनेक कलाकार, उद्योजक सुद्धा हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांच्या गटाची वेगळी बैठक घेतली, भोजन सुरू होण्याआधी अशा दोन टप्प्यांमध्ये बैठक घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व इच्छुक मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या मतदारसंघातील माहिती जाणून घेतली. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याची माहिती आहे.
लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. विस्ताराची तयारीही पूर्ण झाली आहे. आता कोणतेही अडथळे राहिले नाही, एक-दोन मुद्यांवर चर्चा सुरू आहे, त्यावरही तोडगा निघणार आह, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे अनेकजण कमालीचे नाराज झाले आहेत. काहीनी उघड उघड नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नाव चर्चेत आहे.
पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याचं नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात 19 जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.
□ पितृपक्षामुळे विस्तार रखडा
शनिवार, 10 सप्टेंबरला दुपारपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. पितृपक्ष संपल्यावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. त्याचबरोबर याच महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही पूर्ण होणार आहे. त्या यादीतील नाव सुद्धा जाहीर केली जाणार आहे, अशी माहितीही शिंदेंनी दिली.