Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनी तुडुंब, भीमा दुथडी; पंढरपूरचा जुना दगडी पूल पाण्याखाली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

उजनी तुडुंब, भीमा दुथडी; पंढरपूरचा जुना दगडी पूल पाण्याखाली

Surajya Digital
Last updated: 2022/09/09 at 12:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ ‘डीजीसीए’च्या अहवालाची प्रतीक्षा, चिमणीवर १५ सप्टेंबरला सुनावणी

पंढरपूर : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जोरदार पावसामुळे जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण तुडुंब भरले असून भीमा दुथडी भरून वाहत आहे. पंढरीचा दगडीपूल आणि नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यातच उजनीतून विसर्ग सुरू झाल्यामुळे भीमथडीला हुडहुडी लागली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Ujani Tudumba, Bhima Duthdi; Pandharpur old stone bridge underwater sugar factory

भीमा खोऱ्यात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक येत आहे. त्यामुळे धरणातून 61600 क्युसेक पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. सध्या पंढरपूर येथे 32000 क्यूसेक पाणी वाहत असून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच चंद्रभागा नदीपात्रातील सर्व मंदिरे आणि समाधी पाण्याखाली गेल्या आहेत.

उजनी धरणातून गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात असले तरी मागील चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी होती. उजनीवर ही 87 मिलीमीटर पाऊस झाला. हे पाहता धरणातून दिवसभरात टप्प्या टप्प्याने साठ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. भीमा खोर्‍यातील घोड धरणातून 23 हजार क्युसेक पाणी सोडले जात असून ते थेट उजनीत येते. तसेच दौंडचा विसर्ग ही 20 हजार क्युसेक इतका होता. हे पाहता क्षमतेने 110 टक्के भरलेल्या उजनीतून पाणी सोडणे अपरिहार्य होते.

भीमा खोर्‍यातील सर्व धरणांवर पावसाची हजेरी आहे. यामुळेच घोड, चासकमान, आंध्रा, पवना यासारख्या धरणातून पाणी सोडले जात आहे. उजनी प्रकल्प क्षमतेने भरला आहे. यात आता पाणी साठवण करण्यास जागा नसल्याने नदीत पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान निरा नदीवरील वीर प्रकल्पातून पाणी सोडणे सकाळी बंद करण्यात आले आहे.

उजनीत 122.60 टीएमसी एकूण पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणी हे 58.94 टीएमसी इतके आहे. प्रकल्पातून दहिगाव, सीना माढा योजना, भीमा सीना जोडकालवा, मुख्य कालवा यासह वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात आहे.

उजनीच्या पाण्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत असून पाणी पातळी वाढत आहे. यातच नदी परिसरात गेले काही दिवस पाऊस होत आहे. यामुळे नदीकाठी नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ ‘डीजीसीए’च्या अहवालाची प्रतीक्षा, चिमणीवर १५ सप्टेंबरला सुनावणी

साेलापूर : सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालकांचा (डीजीसीए) अहवाल अद्याप आलेला नाही. या कारणास्तव चिमणीबाबतची सुनावणी १५ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

 

हाेटगी राेड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यास सिध्देश्वर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचा अहवाल डीजीसीएने दिला हाेता. या आधारावर महापालिकेने चिमणी पाडकामाची कारवाई हाती घेतली हाेती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात पुन्हा पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश डीजीसीएला दिले.

डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर पालिकेने सुनावणी घेऊन अहवाल सादर करावा, असे सांगितले. त्यानुसार डीजीसीएच्या पथकाने मागील महिन्यात कारखाना, विमानतळ परिसराची पाहणी केली. दरम्यान, महापालिकेत ७ सप्टेंबर राेजी सुनावणी हाेती. डीजीसीएचा अहवाल न आल्याने चिमणी प्रकरणावर १५ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात येईल, आयुक्तांनी सांगितले. डीजीसीएच्या अहवालाच्या आधारे चिमणीचे भवितव्य ठरणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Ujani #Tudumba #Bhima #Duthdi #Pandharpur #oldstone #bridge #underwater #sugarfactory, #उजनी #तुडुंब #भीमादुथडी #पंढरपूर #जुना #दगडी #पूल #पाण्याखाली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दयानंद कॉलेजच्या शिपायाने चिठ्ठी लिहून उचलले टोकाचे पाऊल, जीवास मुकला
Next Article जितेंद्र आव्हाडांना कंटाळून दिग्गज नेत्याने राष्ट्रवादी सोडली, शिंदे गटात सामील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?