मुंबई : मुंबईत लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी (9 सप्टेंबर) मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गर्दी केली होती. पण या मिरवणुकीत बऱ्याच गणेश भक्तांना फटका बसला आहे. कारण या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे. Nashik Ajan, 50 mobile phones stolen along with gold and silver in Lalbagh Raja’s procession
चोरट्यांनी 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि अनेक वस्तू चोरल्या आहेत. चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली.
या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती. मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. गेली दहा दिवस लोक दर्शनासाठी रांगा लावत होते, पण गणपती बाप्पाला निरोप देतावेळी पोलिस स्थानकाबाहेर रांगेत उभे वेळ गणेश भक्तांवर आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेलेल्या वस्तूंची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली. तक्रार नोंदवून घेण्यासाठी भक्तांनी पोलीस स्थानका बाहेर रांगच लावली होती. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांचीही दमछाक झाली. या गर्दीत अनेक मोबाईल, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरट्यांनी लुटले. सुमारे 50 मोबाईल फोन आणि सोनसाखळी चोरीच्या तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ विसर्जनादरम्यान 15 जणांचा मृत्यू
गणपती विसर्जनादरम्यान झालेल्या दुर्घटनेत उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. हरयाणातील महेंद्रगढ येथे विसर्जन सुरु असताना 9 जण पाण्यात वाहून गेले. यातील 4 जणांचा मृत्यू झाला. तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर सोनीपतमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात 8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यात संत कबीरनगर येथे एकाच कुटुंबातील 4 मुलांचा समावेश आहे.
□ अजान सुरु झाली अन् विसर्जन मिरवणुकीतील ढोल वादन थांबवले
नाशिक : नाशिकमध्ये श्री गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम अनोखा उदाहरण पाहायला मिळाले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अजान सुरु होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली.
जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने वादन थांबवलं. त्यानंतर अजान होईपर्यंत काही वेळेसाठी ही मिरवणूक देखील थांबवण्यात आली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजात एक अनोखा एकोपा असल्याचा हे जिवंत उदाहरण नाशिक मध्ये पाहायला मिळाले.