मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सत्तांतर झाल्यानंतर सर्वाधिक चर्चेत कोणी आले असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे होय. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षामुळे राज ठाकरेंचे राजकिय वजन वाढले आहे. त्यात लवकरच मनसे सत्तेत येणार असल्याचे ठाकरे यांच्याकडून मत मांडले आहे. MNS will soon come to power: Thackeray Amit Thackeray Ganapati Visarjan
मनसे सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा जोरात सुरू असतांना राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आम्ही लवकरच सत्तेत येणार असल्याचे म्हटल्याने नेमकं राज्यात काय शिजतयं याची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सत्तेत येणार असल्याचे मोठे विधान केले. अर्थात त्यांनी यावर काहीच स्पष्टीकरण दिले नसल्याने आता ते आगामी निवडणुकांविषयी बोलत होते की, शिंदे-फडणवीस सरकारात सहभागी होणार यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, गणपती विसर्जनानंतर आज (शनिवारी) सकाळी मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावले आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी मनसे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांनी आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. pic.twitter.com/us8D6jBlKT
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 10, 2022
“आपला समुद्रकिनारा आपली जबाबदारी” असे म्हणत वर्सोवा विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली सात बंगला – वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत मोठ्या प्रमाणात समुद्रात किनाऱ्यावर वाहून आलेले निर्माल्य आणि इतर कचरा गोळा केला. यावेळी सफाई मोहिमेत मनसैनिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला. या मोहिमेचे काही फोटो मनसेने ट्विट केले आहेत.
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मनसे शिंदे गटाबरोबर युती करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मनसेची शिंदे गटाशी युती होणार का? याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठ विधान केलं आहे. मनसे आणि शिंदे गटामध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत.
समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार असून सत्तेत आल्यानंतर आम्ही ही यंत्रणा उभारणार असल्याचं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. आणि लवकरच आम्ही सत्तेत येऊ असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, शिंदे गटाबरोबर युती करायची की नाही याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील असं उत्तर त्यांनी दिलं.
मनसेच्या या स्वच्छता मोहिमेत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले होते.