मुंबई : कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांची स्थिती बिकट झाली होती. मात्र दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. त्यामुळे बाप्पानेच व्यापाऱ्यांना भरभरुन दिले. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे. Bappa stepped! Recession on the market removed: After two years, the market turnover increased
सणासुदीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वर्षीचा गणेशोत्सव तर मिठाईवाल्यांना जास्तच गोड झाला आहे. कारण मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के जास्त उलाढाल झाली आहे. खाद्य तेलाच्या मागणीतही गणेशोत्सवात वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे भाव थोडेफार कमी झाल्याने मागणीत वाढ झाली.
यंदा महाराष्ट्रात तब्बल नऊ हजार कोटींची उलाढाल झाली आहे. दोन वर्षांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आणि मार्केटमधील सगळी मरगळच दूर झाली. खरेदी – विक्रीत वाढ झाल्याने राज्यात 30 टक्क्यांनी मार्केटमधली उलाढाल वाढली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.कारण यंदा महाराष्ट्रात तब्बल नऊ हजार कोटींची उलाढाल झाली आहे.
गणेशोत्सवात चांगली उलाढाल होते. पण, गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंर्धाने उत्साहाला लगाम बसला. साहजिकच औपचारिकता म्हणूनच गणेशोत्सव झाला. यंदा दोन वर्षांची ही कसर भरून निघाली. बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेल्याने व्यापाऱ्यांच्या मनोबल वाढले. ग्राहकांच्या भरभरून प्रतिसादामुळे दरवर्षीच्या तुलनेत दुपटीने उलाढाल वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कोरोनानं महागाईनं उच्चांक गाठला होता. बेरोजगारीनं दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. पण दोन वर्षांनी बाप्पा आले आणि मार्केटमधील सगळी मरगळ दूर केली. महाराष्ट्रामध्ये 30 टक्क्यांनी मार्केटमधली उलाढाल वाढली आहे दसरा आणि दिवाळीत गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक व्यापार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावर दसरा आणि दिवाळीत 75 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त विक्री होण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात व्यापाऱ्यांना नफा तर सोडाच गाळे, लाईट, कामगारांचे वेतन देणे कठीण झाले होते. त्यामुळेच व्यावसायिक घाईला आले होते. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात यावर्षी नागरिकांनी गणेशोत्सव दणक्यात साजरा केला. त्यामुळे गेले पंधरा दिवस बाजारपेठेने ग्राहकांचा सळसळता उत्साह अनुभवला. परिणामी, यंदा विघ्नहर्ता गणपती बाप्पा जणू बाजारपेठेला पावले. किराणा, खाद्य, नारळ, फळे, फुले, कपडे, सराफ क्षेत्रात सुमारे सहा कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त आहे.
दरवर्षी देशात 14 ते 15 हजार कोटींची खाद्य तेलाची उलाढाल होत असते. प्रामुख्याने सणासुदीत ही मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ही मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात वार्षिक दीड हजार कोटींची उलाढाल होत असते अशात गणेशोत्सवाच्या काळात राज्यात अंदाजे 60 कोटींहून अधिकची खाद्य तेलाची उलाढाल झाली आहे. बाजारात खाद्य तेलाच्या मागणीत होत असलेली वाढ, आणि साठा उपलब्ध होत असल्यानं बाजारातील मरगळ दूर होत आहे. त्यामुळे बाप्पा हा यंदा खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता ठरला आहे. बप्पामुळेच बाजारावरचं मंदीचं विघ्न दूर केले आहे.
□ PF खातेदारांच्या खात्यात येणार व्याजाचे पैसे
मोदी सरकार आर्थिक वर्ष 2022 चे व्याज EPF खातेधारकांच्या खात्यात टाकणार आहे. त्याचबरोबर 8.1 टक्के दराने व्याज मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2022 मध्ये पीएफ खात्यावर मिळालेल्या व्याजाची गणना केली आहे.. लवकरच हे पैसे खातेदारांच्या खात्यात वर्ग केले जातील. दरम्यान, तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये असल्यास तुम्हाला 81 हजार रुपये व्याज मिळेल.
》घरी बसून EPF शिल्लक असे तपासा
• जर तुमचा मोबाईल नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल तर – तुम्ही मेसेजद्वारे तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता.
• यासाठी तुम्हाला EPFOHO ला 7738299899 वर मेसेज – करावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल.
– तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO मध्ये नोंदणीकृत तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.