अमरावती : लव्ह जिहादचा आरोप करत राजापेठ पोलीस स्टेशन येथे राडा करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार नवनीत राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनामी आणि धमकीच्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. I was going for education, MP Navneet Rana is telling a complete lie: victim girl mistake Ganapati Visarjan troll Amravati
दरम्यान त्या तरुणीने मला कोणीही पळवुन नेले नाही. मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला होता.
अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील एक युवती मंगळवारी भरून निघून गेली होती. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले होते. दरम्यान संबंधित युवकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली होती.
मात्र त्या मुलीने घरून पळून जाण्याचा आणि या युवकाचा कुठलाही संबंध नसल्यामुळे आमच्या मुलाची विनाकारण बदनामी करण्यात आली अशी तक्रार त्या मुस्लिम युवकाच्या कुटुंबीयांनी राजापेठ पोलिसांना दिल्याने पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान संबंधित मुलगी सातारा येथे सुखरुप मिळाली तीने मी स्वताच गेली होती. माझे अपहरण झालेले नव्हते पकडलेल्या मुलाचा माझ्याशी काहीही संबंध नाही तीने सांगितले आणि हे प्रकरण शांत झाले दरम्यान माजी पोलीस अधिकाऱ्याने खासदार नवनीत राणा यांच्या या वागणुकीवर आक्षेप नोंदवला.
पोलीसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी नवनीत राणा यांनी माफी मागावी अशी मागणी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर एका पोलीसाच्या पत्नीने त्याच राजापेठ पोलीस ठाण्यात येऊन पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीना येणाऱ्या अडचणी मांडत नवनीत राणांचा निशेध केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ नवनीत राणांनी गणपतीची मूर्ती गढूळ पाण्यात फेकली
राज्यभरात हिंदुत्वाचा पुरस्कार करून रान उठवणाऱ्या खासदार नवनीत राणा या सतत चर्चेत असतात. हनुमान चालीसावरून तर त्यांनी संपूर्ण उध्दव ठाकरे सरकारच्या नाकी नऊ आणले होते. मात्र त्यानंतर राणा दाम्पत्यांना पूर्ण हनुमान चालीसा म्हणता आले नव्हते, हे मिडियासमोर सिद्ध झाले. आता देव-देवतावरून राजकारण करणाऱ्या नवनीत राणांनी गणपती विसर्जन करतांना जे केले त्यावरून मोठा वाद होत आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या घरच्या बाप्पाच्या विसर्जन पद्धतीमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीला त्यांनी तलावात थेट फेकून दिले. त्यात तलावातील पाणी अत्यंत गढूळ होते, त्यात ज्या पध्दतीने त्यांनी मूर्ती फेकली तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यांच्या विसर्जन पद्धतीमुळे त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या आणि नंतर मुर्तीला तलावात थेट अक्षरश: फेकून देत विसर्जन केलं.
ज्या पाण्यात राणांनी बाप्पाचं विसर्जन केलं, ते पाणी खूपच अस्वच्छ होतं, गढूळ होतं. नवनीत राणांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी राणांना तुफान ट्रोल केलंय. तुम्ही सतत हिंदू धर्म लोकांना शिकवता मग गणपती विसर्जन कसं करतात हे तुम्हाला माहिती नाही का? असे प्रश्न लोक राणांना विचारत आहेत.