मुंबई : राष्ट्रवादीचे अधिवेशन दिल्लीत पार पडले. यावेळी अजित पवार भाषण न करताच मंचावरून निघून गेले होते. त्यामुळे ते नाराज असून मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा होती. मात्र मी वॉशरुमला गेलो होतो, नाराज नाही, राष्ट्रीय पातळीवर बोलण्याचे नेहमीच टाळतो, माझ्यासह अनेकांची भाषणं झाली नाहीत, माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नयेत, मी राष्ट्रवादीच्या राज्यातील सर्व घडामोडीत सक्रीय असतो, असे पवार यांनी स्पष्ट केले. Ajit Pawar said on the anger drama; I went to the washroom in New Delhi Convention
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काल रविवारी दिल्लीत अधिवेशन पार पडले. त्यात अजित पवारांच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यामुळे अजितदादांचा पारा चढला आणि ते थेट व्यासपीठावरून उतरून निघून गेले. या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे तिथे उपस्थित सर्वचजण अवाक् झाले होते.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरून अजित पवारांना परतण्याची विनंती केली. पण त्यानंतरही ते व्यासपीठावर आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच गदारोळ केला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांची समजूत काढण्यासाठी गेल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तोपर्यंत शरद पवारांचे सम रोपाचे भाषण सुरू झाले. यामुळे अजित पवारांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही. हे अधिवेशन काही महाराष्ट्रापुरते नव्हते, राष्ट्रीय अधिवेशन असल्याने म हाराष्ट्रातील काही नेत्यांनी आपले मत मत मांडले.
केरळमधील आणि लक्षद्वीप येथील खासदारांनी भाषण केले. राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे मी भाषणाबद्दल काही बोललो नाही, असे मत अजित पवार यांनी यानंतर व्यक्त करीत सारवासारव केली. अजित पवार यांचा स्वभाव तडकाफडकी आहे. याचा अनुभव अनेकदा पक्षातील पदधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही येत असतो.
□ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (12 सप्टेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजता ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते पैठणच्या सभेसाठी रवाना होतील. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून औरंगाबादचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत.