□ रोजच अपघाताच्या घटना, ग्रामस्थ व शेतकरी वैतागले
विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील सीना नदी काठी असलेल्या विरवडे बु गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्याची वाट लागली आहे. गाव् तस चांगल पण गावाला जोडणारा एकही रस्ता नीट नाही अशी अवस्था गावची झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. Pakni-Virawade Bu to Kamti roads were full of big potholes, the villagers were upset
गावाला जोडणाऱ्या विरवडे – पाकणी, विरवडे – पिरटाकळी शिगोलि , विरवडे ते कामती आदी सर्वच रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले आहेत. विरवडे ते कामती हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रोडवर मोठ मोठे खडे पडले आहेत. दादपूर, लमाणं तांडा येतील मुलांना कामती येथील शाळेला जाताना या रोडवरून खड्यातून पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. यातूनच अनेक छोटे – मोठे अपघात झाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अनेक वेळा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर खड्यातील घाण पाणी वाहनाच्या वर्दलीमुळे उडाले आहे. तर विरवडे ते पाकणी ह्या रस्तावर गुढगाभर खडे पडले आहेत. हा रस्ता होऊन 14 ते 15 वर्ष होत आली , फक्त जर वर्षी एखाद्या ठिकाणी मुरूम टाकतात. अनेक वर्षापासून पूर्ण रस्त्याची दुरुस्ती व डंबरीकरण न झाल्याने या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना व शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
चिंचोली MIDC येथे विरवडे ते पाकणी या मार्गांवरून विरवडे , शिरापूर , पिरटाकली, शिंगोली दादापूर, कामती आदी भागातील अनेकजण याचा मार्गांवरून चिंचोळी MIDC येथे कामाला जाणाऱ्या कामगारांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. या मार्गांवरील खड्डे मोठे आहेत तर रस्त्यावर पूर्ण चिखल व पाणी असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. दुचाकी धारकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरतच् करावी लागत आहे.
या रस्त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. गाव् तस चांगल पण गावाला जोडणारा एकही रस्ता नीट नाही अशी अवस्था गावाची झाली आहे. तरी संबंधित विभागाकडून या मार्गांवरील रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सर्व वाहनधारकासह विरवडे बु ग्रामस्थाकडू होत आहे.