□ 29 सप्टेंबर रोजी मतदान
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सर्व प्रवर्गातील एकूण 39 जागांसाठी 93 जणांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत मंजूर झाले, तर 40 जणांचे अर्ज नामंजूर झाले. Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University Senate Election 93 Applications Approved, 40 Applications Rejected
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटसह विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रेणिक शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली.
यामध्ये सिनेटच्या सर्व प्रवर्गातील 39 जागांसाठी 133 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 40 जणांचे अर्ज अवैध ठरले असून 93 जणांचे उमेदवार अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये प्राचार्यांच्या दहा जागांसाठी नऊ अर्ज आले होते, यातील सर्व अर्ज मंजूर झाले आहेत.
संस्था प्रतिनिधींच्या सहा जागांसाठी एकूण 13 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरले असून दहा अर्ज मंजूर झाले आहेत. शिक्षकांच्या 10 जागांसाठी 30 अर्ज आले होते. त्यापैकी 23 अर्ज मंजूर तर 7 अर्ज अपात्र ठरले आहेत. विद्यापीठ शिक्षकांच्या तीन जागांसाठी पाच अर्ज झाले होते, त्यापैकी तीन अर्ज मंजूर तर दोन अर्ज अपात्र ठरले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पदवीधरच्या दहा जागांसाठी 76 जणांचे उमेदवारी अर्ज आले असून त्यापैकी 48 जणांचे अर्ज मंजूर तर 28 जणांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. विद्यापरिषदेच्या आठ जागांसाठी नऊ अर्ज आले असून सात अर्ज मंजूर तर 2 अर्ज नामंजूर झाले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद, अभ्यासमंडळे आदी जागांसाठी 279 जणांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील आता 93 अर्ज मंजूर झाले आहेत.
अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून 10 सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी- 6, शिक्षकांसाठी-10, पदवीधर मतदारमधून-10 तर विद्यापीठ शिक्षकमधून 3 सदस्य निवडून येणार आहेत. यासाठी आरक्षण विद्यापीठाकडून पूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. विद्यापरिषदेसाठी प्रत्येक विद्याशाखेचे दोन शिक्षक निवडून येणार आहेत.
एकूण चार विद्याशाखा आहेत. त्यानुसार सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर अभ्यासमंडळासाठी ही निवडणूक होणार आहे. प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभागप्रमुख निवडले जाणार आहेत.
उमेदवारी अर्जांची छाननी 13 सप्टेंबर झाली. आता पुढे 16 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. तर 18 सप्टेंबर 2022 रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचे नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे.
त्यानुसार 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 30 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत मतमोजणी होणार आहे.