□ लंपी आजार नियंत्रणासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सज्ज – नरळे
सोलापूर – लंपी आजाराने जनावरे बाधित होऊ नये यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सर्व यंत्रणेसह सज्ज आहे. सोलापुरात माळशिरस तालुका वगळता लंबी आजार जिल्ह्यात नियंत्रणाखाली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तानाजी नरळे यांनी सांगितले. Lumpy skin disease under control in the district except Malshiras taluk in Solapur
सोलापूर जिल्ह्यात छोटे-मोठे मिळून एकूण जनावरांची संख्या 12 लाख 41 हजार इतकी असून आतापर्यंत केवळ जिल्ह्यातील माळशिरस तालुका वगळता आजाराची लागण जिल्ह्यात कुठेही झाले नाही. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार दहा जनावरे बाधित झाली आहेत. जनावरांना उपचार केल्यानंतर जनावरांची प्रकृती चांगली असल्याचे नरळे यांनी सांगितले.
लंपी हा आजार होऊ नये यासाठी जवळपास 21 हजार लस( डोस ) उपलब्ध आहेत. जी जनावरे बाधित आहेत अशा जनावरापासून इतर जनावरे वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी तसेच तो आजार होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने आपापल्या जनावरांना विविध प्रकारचे लस टोचून घ्यावी. सामना करण्यासाठी आवश्यक लस औषधी साधन सामग्री आधी विविध बाबींची उपलब्धता करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे ही बाहेर स्तोत्राद्वारे भरण्यात येणार आहेत. पशुधन विकास अधिकारी गट यांचीही रिक्त पदे लोकसेवा आयोगाकडून शिफारस होऊन नियमित स्वरूपात भरेपर्यंत किंवा अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधनावर बाहेर सेवा द्वारे भरण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉक्टरांची गरज भासेल, त्या त्या ठिकाणी पशुसंवर्धन पीएससीचे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या लंपी आजाराची परिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून हा आजार इतर जनावरांना होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी पशुसंवर्धन विभाग घेत आहे. आतापर्यंत उपलब्ध लसीकरण हिंगोली बजेरी काळमवाडी प्रकारच्या लसी उपलब्ध असल्याचे डॉक्टर नरळे यांनी सांगितले.
□ लम्पी चर्मरोग झालेल्या पशूंचे दूध पित असाल तर…..
भारतीय पशु चिकित्सा संशोधन संस्थेचे (आयव्हीआरआय) संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती यांनी लम्पी चर्मरोगासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. लम्पी चर्मरोग झालेल्या पशूंचे दूध सेवन करणे सुरक्षित आहे, घाबरण्याचे कारण नाही, हा प्राण्यांपासून मनुष्याला होणारा रोग नाही, असे मोहंती यांनी म्हटले आहे. पशूपालन विभागाने दिलेल्या माहितीनुसार विविध राज्यात तब्बल 16.42 लाख पशूंना लम्पी चर्मरोग झाला आहे.