Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव मंगळवेढ्याच्या महाविद्यालयात होणार!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव मंगळवेढ्याच्या महाविद्यालयात होणार!

Surajya Digital
Last updated: 2022/09/15 at 10:18 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ भारतीय विश्वविद्यालय संघाकडून प्राप्त सूचनेनुसार काही बदल

□ 7 ते 10 ऑक्टोबर कालावधीत रंगणार युवा महोत्सव

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव दि. 7 ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. This year’s youth festival of Solapur University will be held in the college of Mangalvedha!

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाकडून युवा महोत्सव घेण्यासाठी प्रस्ताव आले होते. त्यानुसार समितीने संबंधित महाविद्यालयास भेट देऊन यंदाच्या महोत्सवाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनामुळे गतवर्षीचा युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने पार पडला. त्यापूर्वीचा महोत्सव कोरोनामुळे रद्द झालेला होता. आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने युवा महोत्सव होणार आहे. त्यामुळे भारतीय विश्वविद्यालय संघाकडून प्राप्त सूचनेनुसार काही बदल यंदाच्या वर्षीसाठी करण्यात आले आहेत. या वर्षासाठी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवा विद्यार्थी कलाकारांची वयोमर्यादा 25 वर्षावरून 27 इतकी करण्यात आली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

त्याचबरोबर दोन संघ व्यवस्थापक, तीन व्यावसायिक साथीदार आणि विद्यार्थी मिळून एकूण 49 जणांच्या संघाची प्रवेशिका यंदा स्वीकारली जाणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून युवा महोत्सवात कथाकथन आणि काव्यवाचन या कलाप्रकारांचा समावेश करण्यात आल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सांगितले. त्यानुसार आता युवा महोत्सवात एकूण 29 कलाप्रकारांचे सादरीकरण पहावयास मिळणार आहे.

 

■ विद्यार्थी कलाकारांनो तयारीला लागा; कुलगुरू डॉ. फडणवीस यांचे आवाहन

युवा विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सृजनरंगाला एक हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थी कलाकारांचा देखील मोठा प्रतिसाद दरवर्षी युवा महोत्सवाला लाभतो. त्यामुळे हा युवा महोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत आहे.

संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलाकारांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची व संघाची प्रवेशिका देणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Thisyear's #youthfestival #SolapurUniversity #held #college #Mangalvedha #chang, #सोलापूर #विद्यापीठ #यंदा #युवामहोत्सव #मंगळवेढा #महाविद्यालय #सूचनेनुसार #बदल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Lumpy skin disease सोलापुरात माळशिरस तालुका वगळता लंपी चर्मरोग आजार जिल्ह्यात नियंत्रणाखाली
Next Article धुराडे पेटवण्यासाठी कारखाने सज्ज मात्र मागील एफआरपीचे 203 कोटी थकित

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?