यवतमाळ – यवतमाळमध्ये पोलीस मुख्यालयात घुसून पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून निशांत खडसे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. Jalgaon Nishant Khadse killed a policeman by entering the police headquarters due to an old dispute
अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस मुख्यालयाच्या दारात ही घटना घडली आहे. निशांत खडसे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले होते. त्यावेळी मुख्यालयाच्या समोरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने अचानक खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
जुन्या वादातून दोन युवकांनी पोलीस मुख्यालयासमोरच पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री यवतमाळ जिल्ह्यात घडली असून खून प्रकरणाने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. निशांत खडसे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निशांत खडसे हे पोलीस दलात कार्यरत होते. ते काल बुधवारी रात्री कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे गेले होते. तेव्हा दोन तरुणांनी अचानक पोलीस मुख्यालयाच्या गेटजवळ लोखंडी रॉडने हल्ला चढवून निशांत खडसे यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर मारेकरी पळून गेला. यानंतर तेथे असलेल्या सहकारी पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या निशांत खडसे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते; पण अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पोलीस मुख्यालयाच्या गेटजवळच ही घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मारेकर्याकडून निशांत खडसे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मराठा – आक्षेपार्ह वक्तव्य पोलीस निरीक्षक निलंबित
जळगांव – मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी यथील पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे.
एका पोलीस कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याची क्लीप व्हायरल झाली होती. यानंतर मराठा समाजाच्या संघटनांनी आक्रमक होत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.