□ राज्य समजून घेण्यासाठी फिरत असल्याचा टोला
‘Lying another project is like a child’s understanding Sharad Pawar Vedanta Rahul Gandhi China territory
मुंबई : शरद पवारांनी वेदांताचा महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेलेल्या प्रकल्पावर भाष्य केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं दुर्दैवी. हा प्रकल्प परत महाराष्ट्रात येईल असं वाटत नाही, असे ते म्हणाले. दुसऱ्या प्रकल्पाचे आमिष दाखवणे हे लहान मुलाची समजूत काढल्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला. या प्रकल्पाचे खापर मविआवर फोडले जातंय, पण शिंदे, सामंत हे आमच्या सरकारच्या काळातही मंत्री होते, असेही ते म्हणाले.
विरोधकांकडून शिंदे सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केलीये. “वेदांतापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगणं म्हणजे बालिशपणाचं” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.
सध्या राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणांनी सरकारच्या नाकी नऊ आणले आहेत. आताच शिंदे सरकारला दोन महिने पूर्ण झाले त्यावरून शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी चांगलाच खोचक टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मला कारभार काही दिसला नाही, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला. एकनाथ शिंदेंच्या राज्यभरातील दौऱ्यावरूनही शरद पवारांनी चिमटा काढला आहे. शरद पवार म्हणाले की, मला कारभार तर काही दिसला नाही मात्र हे सरकार गतीमान झालेले दिसत आहे. मुख्यमंत्री सध्या राज्य समजून घेण्यासाठी फिरत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
‘गुजरातला काही गेलं तर तक्रार करायची गरज नाही. आता ते दोघे गुजरातचे आहेत. घराकडे ओढ असणे साहजिक आहे. आता जे गेले ते गेले, नवीन काय आणता येईल ते बघायला हवे. भरपूर जेवण झाल्यावर माणूस थंड होतो, तसे महाराष्ट्राचे झाले आहे. त्यामुळे नेतृत्वाने प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य वातावरण निर्माण करायला हवे. रोज काय झाड डोंगर दाखवता, आता राज्याचा विचार होण्याची गरज आहे. राज्य सरकार इतर बाबतीत फार गतिमान आहे,’ अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ नरेंद्र मोदींनी चीनला भारताचा एक हजार चौरस किलोमीटर भूभाग दिला : राहुल गांधी
नवी दिल्ली : राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती चीनने मान्य केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही संघर्ष न करता चीनला एक हजार चौरस किलोमीटर भूभाग देऊन टाकला आहे, असे ते म्हणाले आहेत. सध्या त्यांनी कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा काढली आहे. या दरम्यान ते बोलत होते.
‘भारत जोडो’ यात्रेत असलेल्या राहुल गांधी यांनी ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे, की ताबारेषेवर एप्रिल 2020 ची यथास्थिती कायम राखण्याची भारताची मागणी चीनने धुडकावली आहे. कोणताही संघर्ष न करता पंतप्रधानांनी एक हजार चौरस किलोमीटर भूमी चीनला देऊन टाकली आहे.’ ही भूमी परत कशी मिळेल ? हे भारत सरकार सांगू शकेल? ‘असे सवालही राहुल यांनी उपस्थित केले. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा निर्णय ही तडजोड असल्याचा प्रहार केला.
‘ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती चीनने मान्य केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही संघर्ष न करता चीनला एक हजार चौरस किलोमीटर भूभाग देऊन टाकला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
दोन वर्षांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात संघर्ष झडला होता. वाढलेल्या तणावानंतर ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती पूर्ववत झाल्याखेरीज चीनशी द्विपक्षीय संबंध सुधारणार नाही, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग भागतील गस्तीबिंदू १५ वरून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ती पूर्ण झाल्याचे निवेदन भारताकडून जारी करण्यात आले आहे.
जुलैमध्ये दोन्ही देशांच्या कोअर कमांडर पातळीवरील वाटाघाटींमध्ये याबाबत सहमती झाली होती. या माघारीनंतर मधला पट्टा ‘बफर क्षेत्र” म्हणून मानला जाणार असल्याने भारतीय सैन्याने याआधीचा आपला गस्तीचा अधिकार गमावल्याचीही टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने या निर्णयावर टीका केली.
● पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावर मोठा गदारोळ झाला. पण नरेंद्र मोदी यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय.
हा सामंजस्य करार भारतामध्ये सेमीकंडक्टर्स निर्मितीला वेग देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ही एक कोटी ५४ लाखांची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सहाय्यक उद्योगांसाठी एक प्रचंड परिसंस्था तयार होईल. याचा फायदा मध्यम आणि लघू उद्योगांना होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिलिय. महाराष्ट्रात मोठे उद्योग येणं गरजेचे आहे, त्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि आवश्यक पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. आम्ही त्यासाठी उद्योगांना आवश्यक त्या सवलती द्यायला तयार आहोत, असा मुद्दा आपम मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी, यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, असं आश्वासन दिलं असल्याची माहिती शिंदे यांनी सांगितले.
कंपनीची मानसिकता थोडी बदलली असेल. आपल्याला महाराष्ट्रात आवश्यक तसा पाठिंबा मिळणार नाही, असं कंपनीला वाटलं असेल. तसेच महाराष्ट्रात सरकार बदलेल याची कंपनीला तरी कल्पना कुठे असेल, असं मोदी म्हणाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं आहे. दरम्यान, सर्वात महत्वाचा मानला जाणार हा प्रकल्प गुजरातला गेला कसा याबाबत एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. त्यावेळी या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.