Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल : पालकमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल : पालकमंत्री

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 1:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड हॉस्पिटल संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे, प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार, जिल्हाशल्यचित्सक डॉ.प्रदिप ढेले, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, डॉ.नितीन एकतपुरे, डॉ.एम.के.इनामदार उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पालकमंत्री भरणे म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज व सोयीसुविधायुक्त 100 बेडचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. नागरिकांना येथे योग्य व चांगले उपचार मिळतील. हे कोविड हॉस्पिटल शासननिर्णयाच्या दरानुसार चालविण्यात येणार असल्याने सर्वसामन्य नागरिकांनीही याचा चांगला उपयोग होईल. सर्व संस्था व संघटना सामाजिक बांधलिकी ठेवून काम करत आहेत. अकलूज येथील कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य शासनाच्यावतीने करण्यात येईल.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबधित यंत्रणा समन्वायाने काम करीत आहे. कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून डेडीकेडेड कोविड हॉस्पिटल सुरु केले आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा यांच्या मार्फतच केली जाणार आहे. या हॉस्पिटलमुळे तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांना उपचारासाठी फायदा होणार आहे. रुग्णावरील उपचाराचे दर हे शासननिर्णयानुसारच आकारण्यात येणार आहेत. तसेच हे कोविड हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करावी, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांनी सर्व सुविधयुक्त 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरु केले असून हे राज्यातील पहिले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारा बरोबरच त्यांचे समुपदेशन करण्यात येवून त्यांचे मनोबल वाढविण्यात येणार आहे. या हॉसिपटलचा अकलूज व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेशी संबंधित 150 खाजगी डॉक्टरांनी एकत्रित येवून येथे 20 बेड व्हेंटिलेटर व 80 बेड ऑक्सिजन सुविधा असणारे बनविण्यात आले आहे. हे हॉस्पिटल शासनाच्या नियमानुसार व दर प्रणालीनुसार चालविण्यात येणार असून, रुग्णांना सर्व सेवा संघटनेमार्फत देण्यात येणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती दिली. शासनाच्या वतीने एक हजार पीपीई किट तसेच मास्कचे वाटप पालकमंत्री भरणे हस्ते करण्यात आले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #अकलूज #कोविडहॉस्पिटल #पालकमंत्री #उदघाटन #आदर्श
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्वत्र होत असलेल्या आरोपाचे फेसबुकने केले खंडन; केला मोठा खुलासा
Next Article 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून तरूणीची दीड लाखाची फसवणूक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?