□ उद्या होणार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
कुर्डूवाडी – दिवंगत लोकनेते व माढा तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती व विधानसभेचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पंचायत समिती आवारातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे. उद्या या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. Successful preparation by MLA Shinde brothers for Sharad Pawar’s visit, farmers meeting to be held with statue unveiling
प्रमुख उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचा दौरा उद्या सोमवार रोजी नियोजित झाला आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सध्या आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूंकडून केली जात आहे.
उद्या सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कुर्डूवाडी येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या आवारात स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे . त्यानंतर बायपास रोडवरील संकेत मंगल कार्यालयात माढा करमाळा विधानसभेतील शेतकऱ्यांचा मेळावा आमदार शिंदे बंधू यांनी आयोजित केलेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या मेळाव्याला मार्गदर्शन शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्याची आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे या दोन्ही बंधूं कडून आज तयारीची पाहणी करण्यात आली. दौऱ्याची पाहणी करण्यासाठी माजी आमदार विनायकराव पाटील, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ ऊबाळे, संचालक सुरेश बापु बागल, पंचायत समिती ची बीडीओ डॉ. संताजी पाटील आदी उपस्थित होते.
□ कार्यक्रमाची चर्चा; शरद पवार मेळाव्यात काय बोलणार ?
उद्या राष्ट्रवादीचे भीष्म शरद पवार या कार्यक्रमात येऊन माढेकर शिंदेशाहीवर कोणती गुगली टाकणार? याबाबत चर्चा होत आहे. माजी मंत्री धनंजय मुंढेदेखील उपस्थित राहणार आहेत. शेतकरी मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. शिंदेशाहीने आयोजित केलेल्या सोहळ्यात विशेषतः शेतकरी मेळाव्यात जाणता राजा चाणाक्षपणे तसेच भविष्यातील शिंदेशाहीच्या राजकारणातील नांदी ओळखून कोणती साखर पेरणी करणार? याकडे जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांसह मुख्य राष्ट्रवादी भाजप, शिवसेना, काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांसह शिंदेशाही समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष करून शिंदेशाही पिता पुत्रांचा भाजप प्रवेश निश्चित झाला झाला असतानाही, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना आपल्या प्रांतात आणून धुमधडाक्यात कार्यक्रम होत आहे. याची नागपूर व्हाया दिल्लीपर्यंत चर्चा होत आहे.