पंढरपूर : टेंभुर्णी येथील एका कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अभिजीत पाटील यांची भेट झाली. कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटलांना गाडीत बसण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो मानत शरद पवारांच्या गाडीत बसून पुढील प्रवासाला गेले. Abhijit Patil’s journey towards NCP by sitting in Sharad Pawar’s car
ED raids in Tembhurni
नुकतेच ईडीच्या छापेमारीने चर्चेत आलेले अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या गाडीत बसले आणि गाडी पुण्याकडे मार्गस्थ झाली. या सर्व प्रकारामुळे शरद पवार अभिजीत पाटील यांच्याशी कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार याची चर्चा रंगली आहे. टेंभुर्णीपासून येवतपर्यंत या दोघांमध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
येणाऱ्या काळात अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या चर्चेला आता उधाण आले आहे. कारण स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर तालुक्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अभिजीत पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर सहा साखर कारखाने व्यवस्थित चालवून दाखवले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवून अभिजीत पाटील यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विठ्ठलचे गेल्या दोन वर्षांपूर्वीचे उसाचे बिल अभिजीत पाटलांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील नेतृत्वाची पोकळी अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून भरून निघेल, असे शरद पवारांना वाटत असल्यामुळे त्यांनी अभिजीत पाटलांना सोबत घेऊन आज प्रवास केल्याचे बोलले जात आहे. आता हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशापर्यंत सुरू राहील.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● छापेमारीमुळे मिळाला अभिजित पाटलांना बुस्टर डोस; विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला
पंढरपूर/ सुरज सरवदे
राजकारणात कोणती गोष्ट कधी फायद्याची ठरेल सांगता येत नसते. गेल्या आठवड्यात विठ्ठल, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या खाजगी साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. आयकर विभागाकडे अभिजित पाटील यांच्या विरुद्ध १२८ तक्रारी केल्यानंतरही आयकर विभागाला रिकाम्या हाती माघारी जावे लागते होते.
अभिजित पाटील यांच्याकडे अल्पावधीतच ५ खाजगी आणि एक सहकारी साखर कारखाना आहे. भाजप सत्तेत असताना २०१७ साली अभिजित पाटील यांनी उस्मानाबाद येथे पहिली साखर कारखाना विकत घेतला. त्यानंतर २०१८ नाशिक येथील साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला. त्यानंतर २०१९ साली नांदेड येथील साखर कारखाना विकत घेतला. तिन्ही साखर कारखाने व्यवस्थित चालवले. अभिजित पाटलांनी शेतकऱ्यांना वेळेवर बिल, कामगारांच्या पगारी, ऊस तोडणी वाहतूकदारांची वेळेवर दिल्यामुळे देणी वेळेवर शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने २०२१ साली १२ वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांना भाडेतत्त्वावर दिला.
शेतकऱ्यांची बिले, कामगारांच्या पगारी देऊन कारखाना चालवला. विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे सांगोला सहकारी
साखर कारखान्याने बहुतांश विठ्ठलच्या सभासदांचा ऊस गाळप केला आणि त्याचवेळी विठ्ठलच्या राजकारणात उडी घेतली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे उद्ध्वस्त झालेल्या विठ्ठल साखर कारखाना सभासदांनी अभिजित पाटील यांच्या ताब्यात दिला.
विशेष म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे २००७ साली ऊस टोळी मालक असलेले अभिजित पाटील विठ्ठलचे अध्यक्ष झाले. याच दरम्यान बीड येथे सहावा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला.
आयकरच्या धाडींचा परिणाम अभिजित पाटील यांच्याबद्दल प्रचंड सहानभूती वाढली आहे. विठ्ठल परिवारातील नेते, कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांना भेटून आपला पाठिंबा दर्शविला आहे. आयकरच्या कारवाई दरम्यान अनेकांनी देव पाण्यात ठेवून अभिजित पाटील यांच्यावरील कारवाई थांबवण्याची प्रार्थना केली होती. आयकरच्या करवाईमध्ये काहीही निष्पन्न न झाल्यामुळे अभिजित पाटील हे सहकारातील, राजकारणातील निष्कलंकित नेतृत्व असल्याचे सिद्ध झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
□ विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला
अभिजित पाटील यांच्यावर आयकरची छापेमारी राजकीय हस्तक्षेपामुळे झाल्याची अंदाज अभिजित पाटील यांनी व्यक्त केला. आयकरच्या छापेमारी काही सापडले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते तर वावगं ठरलं असतं. मात्र छापेमारी अमच्यामुळे सुरू झाली असे सोशल मीडियावर टाकणे विरोधकांना अंगलट आले. याचाच फायदा अभिजित पाटील यांनी घेतला. छापेमारीनंतर अभिजित पाटील यांनी पुन्हा परिचारक यांना थेट अंगावर घेतले. आपल्या नेतृत्वाची धमक दाखवली. त्यामुळे विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला. स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यानंतर विठ्ठल परिवाराला अभिजित पाटील यांच्या रुपात तरुण ताडपदार, धाडसी नेतृत्व मिळाले आहे.