मुंबई : अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ते 59 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण 41 दिवसांनंतरही त्यांना शुद्ध आली नाही. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते. पण राजू यांच्या निधनाची बातमी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी आहे. Emotional tribute! The king of comedy, actor Raju Srivastava passed away
अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज अखेर निधन झाले आहे. राजू श्रीवास्तव यांनी भारतातच नाही तर परदेशातही काम केले. राजू यांच्या प्रसिद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोमधून मिळालेले यश. ते लहानपणापासून कलाकारांची आणि सेलिब्रिटींची नक्कल करत असे. ही मिमिक्री करण्याचे कौशल्य त्यांना वडील रमेश श्रीवास्तव यांच्याकडून मिळाले. रमेश हे गावातील छोट्या-छोट्या कार्यक्रमात लोकांची मिमिक्री करायचे, ते पाहून राजू मोठे झाले होते.
कॉमेडिचा बादशहा अशी त्याची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजू जवळपास ४० दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते.
RIP🙏 Shri Raju Shrivastav Ji.
Ishwar unki aatma ko Shanti pradhan kare
🕉 Shanti💐 https://t.co/f65qSuIPCS— Dhanvanti Bachan Singh (@DhanvantiBachan) September 21, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव. राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली.
राजूचे घराघरात नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.
□ राजू श्रीवास्तव यांनी ‘या’ चित्रपटांमध्येही काम केले
– राजू श्रीवास्तव हे 1980 च्या दशकाच्या शेवटपासून मनोरंजन विश्वात सक्रिय होते.
– 2005 मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टैंड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात भाग घेतल्यानंतर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
– त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ (रिमेक ) आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.