मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मला पत्रकारांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत? पांढरे कपडे का घातला ? तेव्हा त्यांना मी सांगितले की, भगवा आमच्या हृदयात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. …so I don’t wear saffron but white – Not a single BJP leader with Chief Minister Eknath Shinde
शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला पत्रकरांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत? पांढरे कपडे का घातला? तेव्हा त्यांना मी सांगितले की भगवा आमच्या हृदयात आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
अनेकदा शिंदे गट आणि शिवसैनिक आमने – सामने आल्याचं पहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजाकारण चांगलेच तापले होते. रामदास कदम यांच्या या वक्तव्याला शिवसैनिकांकडून आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दुसरीकडे वेदांतावरून देखील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. वेदातांवरून देखील शिंदे गटाकडून शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ शिंदेंसोबत भाजपचा एकही नेता नाही
वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, यामध्ये भाजपचा एकही नेता नसल्याने राज्य सरकारमध्ये सर्व आलबेल आहे ? अशा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे ३ लाख कोटीपेक्षा जास्त किंमतीचे प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पडून आहेत. आता या प्रकल्पाला मंजूरी मिळावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचा एकही मंत्री नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याच गटातील उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे सोबत असणार आहे.
याआधी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते. विशेष बाब म्हणजे या सर्व राजकीय भेटी होत्या. मात्र, जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडायचा प्रश्न आला तेव्हा शिंदे यांच्यासोबत भाजपचा एकही राज्यातील नेता नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.