□ भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची माहिती
सोलापूर : भाजपने आपल्याला पाच वेळा उमेदवारी दिली आणि जनतेनेही आपल्याला मतं दिली. त्यामुळे मी 25 वर्ष नगरसेवक राहिलो. भाजप पक्ष आपली आई आहे जर आईने तिकीट दिले नाही तर आजोबा मानत असलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आपण निश्चित विचार करणार असल्याचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले. If the ‘mother’ BJP rejects the ticket, we will consider Balasaheb’s ‘grandfather’ Shiv Sena: Suresh Patil
भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील कामानिमित्त महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुरेश पाटील म्हणाले की, शहर उत्तर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आपण सुरुवातीपासूनच पक्षाचा लुच्चा नव्हे तर सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षानेही आपल्याला पाच वेळा उमेदवारी दिली. जनतेनेही भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आपण पंचवीस वर्षे नगरसेवक राहिलो. पक्ष आपल्याला निश्चित उमेदवारी देईल यात शंका नाही मात्र मध्ये चमचेगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपण भाजपमध्येच निवडणूक लढवणार आहे. भाजप पक्ष हा आपली आई आहे. मात्र आईने उमेदवारी न दिल्यास प्रसंगी आपण आजोबा मानत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचाही विचार करणार आहे. प्रत्येक टर्ममध्ये आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केले आहेत. त्यामुळे लोकांनी मला भरभरून मतदान केलं आहे. कामच केलं नसतं तर लोकांनी निवडून दिलं नसतं. जे काम करतात ते निवडून येतातच, असा विश्वास सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ प्रा. शिवाजी सावंत यांच्या खांद्यावर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या खांद्यावर सोलापूर जिल्हाच्या शिवसेना संपर्कप्रमुखपदाची (शिंदेगट) नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी काढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनाच्या ( शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या यापूर्वी निवडी झाल्या आहे. माढा तालुक्यातील निवडीवरून वाद निर्माण झाला होता. जिल्हाप्रमुख ठोंगे पाटील, संजय कोकाटे, महेश साठे यांच्या निवडीवर अक्षेप घेण्यात आला होता. या निवडी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विश्वासात न घेता नियुक्ती झाल्या होत्या हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला होता. सोलापूरातील पदाधिकाऱ्यांची या बाबत बैठक झाली.
चर्चा बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आ. शहाजी पाटील, सचिव संजय मोरे यांच्या समवेत अमोल शिंदे, मनिष काळजे, महेश चिवटे, ठोंगे पाटील, संजय कोकाटे यांचा पाच जिल्हाप्रमुखासह शहर प्रमुख मनोज शेजवाल, उपजिल्हाप्रमुख हरीभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांनी मते मांडली.
सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी प्रा. शिवाजी सावंत यांच्याकडे द्या संपूर्ण सोलापूर जिल्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे ठामपणे सांगितले. अखेर प्रा. शिवाजी सावंत यांच्या खांद्यावर सोलापूर जिल्हा संपूर्ण संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तानाजी सावंत आणि नूतन संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बळकट करण्याचे काम करणार असल्याचे जिल्हाप्रमुख शिंदे यांनी सांगितले.