□ गोल्डनगॅंगशी सावध राहण्याचा सल्ला
अक्कलकोट /रविकांत धनशेट्टी
नेहमीप्रमाणे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वरच्या कार्यालयात सोमवारी जनता दरबार चालू असताना अचानकपणे भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील उर्फ अप्पांची एंट्री होते. मग काय पुढे काय वाचा पूर्ण बातमी. Appa’s entry in MLA Sachin Kalyanshetty’s Janata Darbar Sidramappa Patil Akkalkot Goldengang cautious
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील जनता दरबारात आल्याचे माहिती मिळताच आमदार कल्याणशेट्टी लगेच खाली जावून अप्पाची विचारपूस करतातच तेव्हा अप्पा लगेच चला ऑफिसमध्ये बसू म्हणून गाडीतून उतरून आमदार कल्याणशेट्टी यांच्या आधाराने पायरी चढून ऑफिस मध्ये आले.
मग काय चालू झालं जुन्या, नवीन राजकीय चर्चा सत्र. वयाचे 84 पार केलेले अप्पा चर्चा करत असताना मात्र एकवीस वर्षाचा युवा दिसत होते. आप्पा आल्याची माहिती मिळताच त्यांची राजकीय बोली भाषा ऐकण्यासाठी भाजपा कार्यालयात गर्दी जमली होते. अप्पांनी जुने नवे राजकीय चांगले व वाईट कटू अनुभव सांगत असताना गोल्डनगॅंग ची आवर्जून नाव काढत त्यांच्यावर शब्दांची वार करत गोल्डन गँगचा माती केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे म्हणत कन्नड भाषा मध्ये “नन्न संगट गद्दार माडदवरू यल्लारू होग्यार इनु नालकू जना इदार अवरिगु ना मन्नू माडीने बिडतीनी ” असे त्यांच्या नेहमीच्या शैलीने कन्नडमध्ये बोलत राजकीय चर्चा रंगत गेली. यावेळेस हशा पिकला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी योगा योगाने अप्पाचे ज्येष्ठ सहकारी स्वामीरावकाका पाटील यांची देखील हजेरी होती. अप्पांनी दहिटणेचे स्वामी समर्थ साखर कारखाना चालू करण्याच्या तयारी सोबत सहकार व राजकीय क्षेत्रात ही आपली दबदबा निर्माण करण्याचे प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.
येत्या काळात होऊ घातलेल्या सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीत भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे राजकीय अनुभव कल्याणशेट्टी यांना अभ्यास साठी महत्वाचे असेल असं म्हटले जात आहे. ज्या नव्या उमेदीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखाना चालू करण्यासाठी अप्पाने जो प्रयत्न चालू केले आहेत, त्या प्रयत्नात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे हे सहकार्य मोलाचे असल्याचे अप्पा यांनी म्हटले.
आप्पा म्हणाले, आमदार कल्याणशेट्टी हे शांत, संयमी व निस्वार्थी व्यक्ती असून त्यांना गोल्डन गँग म्हेत्रेंचे ऐकून जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न करत असून त्याचे आजूबाजू कार्यालय परिसरात गोल्डनगँग फिरत आहेत. त्या लोकांपासून सावध राहावे नाहीतर तर तुमचं ही माती करतील, असा राजकीय सल्ला आप्पांनी कल्याणशेट्टी यांना दिले.
एकंदरीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यापासून जुने नवीन कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात व तालुक्यात भाजपा मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशीर आहे.
आप्पांनी सहकार क्षेत्राची जुनी आठवण सांगत असताना सभापती पदी निस्वार्थपणाने केल्यावर त्याचीच जवळेचे लोक त्यांना राजकीय गेम कसे केले ते ही सविस्तर पणे सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मी सचिन कल्याणशेट्टी यांना मदत केली असून, म्हेत्रे यांना खाट मारली आहे. आगामी अक्कलकोट न. पा. निवडणुकीत कल्याणशेट्टी परिवाराकडून एक उमेदवार उभा करण्याचे ही अप्पांनी सांगितले. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व न. पा., बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यायला पाहिजे, याकरिता आत्ताच कामाला लागायला पाहिजे, असे सिद्रामप्पा पाटील यांनी म्हटले.
एक नाही अनेक नव्या जुना आठवणींना आप्पांनी उजाळा दिला. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी पहिल्यांदाच भाजपा कार्यालयाला भेट दिल्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, जेष्ठ नेते स्वामीराव पाटील, शरणू चौलगी, शहर अध्यक्ष शिवशरण भोजन,माजी उपसभापती विलासराव गव्हाणे,कमलाकर सोनकांबळे, चपळगाववाडीचे युवा नेते सिद्धाराम अंकलगे, पालापूरचे कनकुटले, प्रकाश पोमाजी, भीमा तोरणगी, निजप्पा गायकवाड, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.