अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीना – भोगावती जोड कालव्याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक लावणार असल्याची माहिती या बैठकीत त्यांनी दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आमदार राजेंद्र राऊत, जलसंपदा विभागाचे सचिव वी. वी. राजपूत व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत सदर योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना व इतर चार तालुक्यांना या योजनेचा कसा लाभ होईल याबाबत माहिती देण्यात आली होती.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून, या योजनेच्या फेर सर्वेक्षण संदर्भात आदेश काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार, या योजनेचा सर्वे करण्यास महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाच्या उपसचिव जया पोतदार यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना पत्राद्वारे कळविले असून लवकरच सीना भोगावती जोड कालवा होण्याबाबत, सीना नदीवरून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पुनर्भरण प्रकल्पाचे लाभ क्षेत्र सर्वेक्षणा बाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.