सोलापूर : जिल्हा परिषदेच्या भिंतीलगत असलेली खाेकी काढण्यासाठी महापालिकेचे पथक बुधवारी (ता. 21) सकाळी पाेहाेचले. खाेक्यांसमाेरील कट्टे उखडले. दुकानदारांची पळापळ झाली. यादरम्यान महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फाेन केला आहे. तुम्ही कारवाई करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई हाेईल, असा निराेप राजकीय कार्यकर्त्यांनी दिला त्यामुळे कारवाई थांबली. As soon as the ministry received a call, the encroachment removal campaign in Solapur started
Lumpy Bull Death
जिल्हा परिषद, काँग्रेस भवनासमाेरील खाेकी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी या भागातील अनधिकृत दुकाने हटविण्याचे आदेश भूमी व मालमत्ता विभाग, अतिक्रमण विराेधी पथकाला दिले हाेते. त्यानुसार पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक बुधवारी सकाळी काँग्रेस भवनासमाेर दाखल झाले.
साेबत जेसीबी, साहित्य जप्त करण्यासाठी वाहने हाेती. सर्व खाेक्यांमधील साहित्य बाहेर काढा, सर्वच जप्त हाेणार असल्याचे पथकातील लाेक सांगू लागले. खाेकेधारक संघटनेचे अध्यक्ष गाैतम मसलखांब आणि इतर लाेक पथकाकडे पाेहाेचले.
आमची दुकाने बेकायदेशीर नाहीत. आमच्या पुनर्वसनाचा विषय प्रलंबित आहे. एकतर्फी कारवाई करू नका, अशी विनंती केली. आमदार विजयकुमार देशमुख, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना फाेन केले. काळजे, बापू ढगे आणि इतर कार्यकर्ते दाखल झाले. मुख्यमंत्री कार्यालयातून मनपा आयुक्तांना फाेन गेला आहे. तुम्ही कारवाई करू असे ढगे यांनी अतिक्रमण पथकाला आणि मनपा उपायुक्त मच्छिंद्र घाेलप यांना सांगितले. यादरम्यान कारवाई थांबली.
□ … अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल
महापालिकेचे अतिक्रमण पथक खोके काढत होते. त्यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यात हस्तक्षेप केला. महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला आहे. तुम्ही कारवाई करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, असा त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे पथकातील अधिकारही अवाक झाल्याचे दिसून आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर । लम्पीमुळे तिरवंडीत बैलाचा झाला मृत्यू
सोलापूर – जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. असे असले तरी तिरवंडी (ता. माळशिरस) येथील हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 21) घडली आहे.
लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. जिल्ह्यातील २४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून सध्या ४८ लम्पीबाधित जनावारांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ७२ गाय आणि बैल व एक म्हैस अशा ७३ जनावारांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी २३ गाय व १ म्हैस, अशी एकूण २४ जनावारे बरी झाली प्र:स्थितीत ४८ गाय आहेत. सद्य: लम्पीबाधित आहेत. आतापर्यंत ४२ हजार ८९१ जनावारांना लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यासाठी सध्या लम्पी लसचे १ लाख ८८ हजार ६०९ डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत माळशिरस तालुक्यात ४९, सांगोला तालुक्यात ११, उत्तर सोलापूर तालुक्यात ४, माढा तालुक्यात ५, मंगळवेढा तालुक्यात १, पंढरपूर तालुक्यात २ व बार्शी तालुक्यात १ लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत.