Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महापालिका परिवहन उपक्रमातील दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या 21 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

महापालिका परिवहन उपक्रमातील दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या 21 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई !

Surajya Digital
Last updated: 2022/09/22 at 9:18 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
□ कर्मशाळा प्रमुख लिगाडेंना बजावली बडतर्फीची नोटीस□ या कर्मचाऱ्यांवर केली कारवाई !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मंत्रालयातून फोन येताच सोलापुरातील अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली□ … अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल

सोलापूर : डबघाईला आलेल्या आणि तोट्यात असलेल्या सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमांकडील आतापर्यंत तब्बल 21 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता कामचुकार व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Dismissal action against 21 employees who have been absent for a long time in municipal transport activities!

“आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या !” अशा परिस्थितीत अडकलेल्या सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाने गेल्या दोन वर्षात कामचुकार, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या महापालिकेतील परिवहन उपक्रमाला उर्जितावस्था देण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. वरचेवर विविध कारणास्तव मनपा बस सेवा ही तोट्यातच चालत असून परिवहन उपक्रम पुरता डबघाईला आला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या स्थितीत दोन वर्षात परिवहन उपक्रमाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. सेवा देणाऱ्या बसेसची संख्या कमी आणि दहा-वीस पटीने कर्मचारी संख्या आणि त्यांच्या वेतनावरील खर्च याचा भार पडत असल्याने यापूर्वी तत्कालीन आयुक्तांनी कामगार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार एकवट काही रक्कम देण्यात येणार होती. या योजनेसाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली.. काहींना त्याचा लाभ ही देण्यात आला.

मात्र नंतर महापालिकेची आर्थिक स्थिती देखील बिकट असल्याने ही योजना रखडली. यानंतर मात्र परिवहनमधील काही कामगार कर्मचाऱ्यांना महापालिकेकडे कामासाठी वर्ग करण्यात आले. याशिवाय परिवहनला विविध प्रकारे उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी मात्र परिवहन कामगार कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी विविध बाबी तपासण्यात आल्यानंतर अनेक कामगार कर्मचारी हे तीन तीन वर्षे विनापरवानगी गैरहजर तर अनेक कर्मचारी कामचुकार असल्याची बाब पुढे आली आहे. यानुसार अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

□ कर्मशाळा प्रमुख लिगाडेंना बजावली बडतर्फीची नोटीस

परिवहन उपक्रमातील कर्मशाळा प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या श्रीशैल लिगाडे यांच्यावर सध्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात एका प्रकरणात बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली. यामध्ये त्यांचा खुलासा प्राप्त झाला आहे. आता पुन्हा दुसऱ्या प्रकरणात तशाच प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता आयुक्तांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

□ या कर्मचाऱ्यांवर केली कारवाई !

परिवहन उपक्रमातील आतापर्यंत गैरहजर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येऊन टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये मडिवाळाप्पा म्हेत्रे, राजेंद्र स्वामी, मल्लिकार्जुन दुपारगुडे, राजकुमार कोकरे, दिनेश पुजारी, दत्तूसा बारड, खाजासाब मुल्ला यांच्यावर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात गुरुलिंग देशमाने, श्रीमंत कांबळे, शिवशंकर खमितकर, बळीराम पवार, धनंजय गवई, संजय अलकुंटे, तुकाराम बोमण यांच्यावर आणि तिसऱ्या टप्प्यात नुकतेच खंडोबा कोळी, प्रियदर्शन मेंढापूरकर, मोहम्मद हनीफ शेख, महादेव कस्तुरे, शाहू सलगर, महादेव करजगी आणि लक्ष्मण पवार शिपाई, वाहक, चालक अशा कर्मचाऱ्यांवर दीर्घकाळ परवानगीशिवाय गैरहजर राहिल्याने थेट बडतर्फीची कारवाई केली आहे.यावरून आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन असल्याचे दिसून येते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ मंत्रालयातून फोन येताच सोलापुरातील अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या भिंतीलगत असलेली खाेकी काढण्यासाठी महापालिकेचे पथक बुधवारी (ता. 21) सकाळी पाेहाेचले. खाेक्यांसमाेरील कट्टे उखडले. दुकानदारांची पळापळ झाली. यादरम्यान महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फाेन केला आहे. तुम्ही कारवाई करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई हाेईल, असा निराेप राजकीय कार्यकर्त्यांनी दिला त्यामुळे कारवाई थांबली.

जिल्हा परिषद, काँग्रेस भवनासमाेरील खाेकी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी या भागातील अनधिकृत दुकाने हटविण्याचे आदेश भूमी व मालमत्ता विभाग, अतिक्रमण विराेधी पथकाला दिले हाेते. त्यानुसार पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक बुधवारी सकाळी काँग्रेस भवनासमाेर दाखल झाले.

साेबत जेसीबी, साहित्य जप्त करण्यासाठी वाहने हाेती. सर्व खाेक्यांमधील साहित्य बाहेर काढा, सर्वच जप्त हाेणार असल्याचे पथकातील लाेक सांगू लागले. खाेकेधारक संघटनेचे अध्यक्ष गाैतम मसलखांब आणि इतर लाेक पथकाकडे पाेहाेचले.

 

आमची दुकाने बेकायदेशीर नाहीत. आमच्या पुनर्वसनाचा विषय प्रलंबित आहे. एकतर्फी कारवाई करू नका, अशी विनंती केली. आमदार विजयकुमार देशमुख, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना फाेन केले. काळजे, बापू ढगे आणि इतर कार्यकर्ते दाखल झाले. मुख्यमंत्री कार्यालयातून मनपा आयुक्तांना फाेन गेला आहे. तुम्ही कारवाई करू असे ढगे यांनी अतिक्रमण पथकाला आणि मनपा उपायुक्त मच्छिंद्र घाेलप यांना सांगितले. यादरम्यान कारवाई थांबली.

□ … अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल

 

महापालिकेचे अतिक्रमण पथक खोके काढत होते. त्यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यात हस्तक्षेप केला. महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला आहे. तुम्ही कारवाई करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, असा त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे पथकातील अधिकारही अवाक झाल्याचे दिसून आले.

You Might Also Like

पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाची मान्यता देणार – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन

ब्रिटनने दहशतवादी मानसिकतेवर कठोर कारवाई करावी – पंतप्रधान मोदींचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांची कोंडी; साखर कारखान्यांकडे ८५ कोटी रुपये थकीत

विमा पॉलिसी विक्रीसोबत जनजागृती आणि विश्वासार्ह सेवेवर भर द्यावा – राज्यपाल राधाकृष्णन यांचे आवाहन

“काँग्रेसशासित राज्यांत जातनिहाय जनगणना करू” – राहुल गांधी

TAGGED: #solapur #Dismissal #action #employees #absent #longtime #municipal #transport #activities!, #सोलापूर #महापालिका #परिवहन #उपक्रम #दीर्घकाळ #गैरहजर #कर्मचारी #बडतर्फी #कारवाई !
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांनी दिल्ली वाऱ्या करत महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवला
Next Article सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी स्किन’ चा पहिला बळी; सरकारी मदतीत वाढ करण्याची मागणी

Latest News

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारकडून अभ्यासक्रम — मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन
देश - विदेश July 25, 2025
राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळली; ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
देश - विदेश July 25, 2025
पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाची मान्यता देणार – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन
Top News देश - विदेश July 25, 2025
पंतप्रधान मोदी ठरले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सलग पदावर राहणारे पंतप्रधान
देश - विदेश July 25, 2025
ब्रिटनने दहशतवादी मानसिकतेवर कठोर कारवाई करावी – पंतप्रधान मोदींचे आवाहन
Top News July 25, 2025
सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांची कोंडी; साखर कारखान्यांकडे ८५ कोटी रुपये थकीत
Top News July 25, 2025
पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर; राष्ट्रपती मुइझ्झूंनी केले उबदार स्वागत
देश - विदेश July 25, 2025
‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून काढण्याची कोणतीही योजना नाही – कायदा मंत्री मेघवाल
देश - विदेश July 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?