सोलापूर : माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा अत्याचाराबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक मनोहर सपाटे यांच्या अटकेसाठी मार्गावर लागले आहेत. पण सपाटे यांचा शोध लागत नसून ते फरार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी म्हटले आहे. Ex-mayor Manohar Sapte absconded as soon as the case of torture was registered, police search is on
संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नैसर्गिक तसेच अनैसर्गिक अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्याचे कुणकुण लागतात. मनोहर सपाटे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. पीडित महिला ही शाळेत शिक्षिका विधवा होती. त्यावेळी तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून सपाटे यांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकीन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन, असे धमकावत तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला.
शिवाय तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तिची इच्छा नसतानाही तिचा राजीनामा घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशा आशयाची तक्रार पीडित महिलेनी दिली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर तसेच फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी या तक्रारची गंभीर दखल घेतली आहे.
दरम्यान हे वृत्त शहरभर पसरल्याने मराठा समाजातील विविध संघटना एकवटल्या व त्यांनी पोलीस आयुक्तांकडे सपाटे यांच्या अटकेसंदर्भात मागणी केल्याने अखेर सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्याने आता फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या मार्गावर आहे. मनोहर सपाटे यांना शोधण्यासाठी आम्ही घरी देखील गेलो व सर्वत्र त्यांचा शोध घेतला परंतु ते कुठेही मिळून येत नाहीत. सपाटेंचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, पंचनामे, खंडणी मागितल्याचे मोबाईल रेकॉर्डिंग, अत्याचार ग्रस्त ठिकाणाची पाहणी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी म्हटले.
》 सपाटेंच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन
तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जिथे शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी मनोहर सपाटे यांच्यासारखे संस्था अध्यक्ष पदाचा धाक दाखवून जर असे वागत असतील तर त्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तसेच इतरांवरही अन्याय-अत्याचार झाल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मराठा समाज सेवा मंडळ या संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांची चौकशी करून सपाटेवर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.
मराठा समाजात शैक्षणिक प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने कै. ॲड. ए. तु. माने, ब्रम्हदेव माने, निर्मलाताई ठोकळ, शंकरराव कोल्हे, जगन्नाथ भोईटे यासह सोलापूरच्या मराठा समाजातील लोकांनी वर्गणी काढून स्थापन केलेल्या या संस्थेच्या शाळेतच मराठा शिक्षिकेवर अन्याय-अत्याचार झालेला आहे. याबाबत सर्वसामान्य मराठ्यांच्या तीव्र भावना असून व संस्थाध्यक्ष सपाटे यांच्याविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मनोहर सपाटेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून संबधित संस्थेवर तातडीने प्रशासक नेमून निपक्ष तपास करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर दास शेळके, नानासाहेब काळे, दिलीप कोल्हे, सुनिल रसाळे, शशि थोरात, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, बजरंग आवताडे, शेखर फंड, सोमेश पवार, उत्तम खुटे, रामचंद्र कदम, डी. एन. जाधव, जयवंत सुरवसे, विजय पोखरकर आदींनी सह्या केल्या आहेत.