□ भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 14 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद
मुंबई : पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या पालकमंत्री पद निश्चितमध्ये भाजपचाच वरचष्मा दिसून आला आहे. यात भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 14 जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले आहे. Radhakrishna Vikhe-Patil Solapur, Ahmednagar while Devendra Fadnavis is the guardian minister of 6 districts
फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली आहे.
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा झाली आहे. सोलापूरसाठी ही अनपेक्षित निवड आहे.
शिंदे – फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाले खरे, पण जवळपास तीन महिने होत आले तरी पालकमंत्रीपदाची नेमणूक करण्यात आली नव्हती. अखेर राज्य सरकारला मुहूर्त सापडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून गिरीश महाजन यांची धुळे, लातूर, नांदेडवर बोळवण करण्यात आली आहे.
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 15 जिल्हे (शिंदे गटा)कडे आले आहेत. 15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे. सातारा, ठाणे, मुंबई शहर , कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत.
□ पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे –
राधाकृष्ण विखे पाटील- नगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील – पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत – परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर