सोलापूर – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मान्यतेने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी नुकत्याच जाहीर केल्या आहेत. Vitthal Wankar as Solapur City Youth Officer of Yuva Sena; Officials of city-district announced
युवा सेनेच्या सोलापूर शहर युवा अधिकारीपदी विठ्ठल वानकर यांची नियुक्ती केली असून शहर – जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आली आहे.
● शिवसेनेशी निष्ठा कायम राहणार – विठ्ठल वानकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे व युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने आगामी काळात युवा सेनेच्या माध्यमातून आणखी चांगले काम करण्याचा मानस नूतन शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांनी व्यक्त केला.
आत्तापर्यंत आणि यापुढेसुद्धा आपली शिवसेनेशी असलेली निष्ठा कायमच राहणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून जोमाने काम करणार असल्याचा विश्वासही विठ्ठल वानकर यांनी व्यक्त केला.
सत्ता असो अथवा नसो, शिवसेना ही कायमच गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या हितासाठी बांधील राहिली आहे, आणि ती कायमच जनतेसोबत राहणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद वाढविण्यासाठी सोलापूर शहरात तितक्याच जोमाने स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने युवा सेना वाढविण्यावर आपला भर राहणार असल्याचेही विठ्ठल वानकर यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
– युवा सेनेचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हा चिटणीस – ऍड , मल्लिकार्जुन कारमपुरी ( सोलापूर शहर मध्य ,सोलापूर शहर उत्तर ,सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभा ) . जिल्हा समन्वयक – सुमित साळुंखे ( सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर ,सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभा ) . उपजिल्हा युवा अधिकारी – खंडू सलगरकर ( सोलापूर दक्षिण विधानसभा – शहर विभाग ) , रमेश चौगुले ( सोलापूर दक्षिण विधानसभा – ग्रामीण विभाग ), गणेश धाराशिवकर ( सोलापूर उत्तर विधानसभा – शहर विभाग ) , प्रसाद निळ ( सोलापूर उत्तर विधानसभा- ग्रामीण विभाग ) , अमर बोडा ( सोलापूर शहर मध्य विधानसभा ) , विधानसभा युवा अधिकारी – राहुल गंधुरे ( सोलापूर दक्षिण विधानसभा ),प्रणय इराबत्ती ( सोलापूर शहर मध्य विधानसभा ) , सुभाष सातपुते ( सोलापूर शहर उत्तर विधानसभा ) .
शरण सुरवसे ( अक्कलकोट तालुका ) . तालुका युवा अधिकारी – धर्मराज बगले ( सोलापूर दक्षिण विधानसभा – ग्रामीण ) , विश्वनाथ कोगणूरे ( अक्कलकोट तालुका ) , शंभुराजे फरतडे ( करमाळा तालुका ) .
सोलापूर शहर युवा अधिकारी – विठ्ठल वानकर ( सोलापूर शहर ) , आकाश साठे ( मंद्रूप ,शहर युवा अधिकारी ) , समीर परदेशी ( करमाळा शहर ) , शहर समन्वयक – गुरुनाथ शिंदे ( सोलापूर शहर ),शहर चिटणीस – योगेश भोसले (सोलापूर शहर ), उपशहर युवा अधिकारी – उमेश जेडगी ( दक्षिण विधानसभा ,शहर विभाग ) , विनोद घोडके – ( दक्षिण विधानसभा, शहर विभाग ),अप्पू बिराजदार- ( दक्षिण विधानसभा, शहर विभाग ),अमेय कळसकर – ( सोलापूर शहर, उत्तर विधानसभा ) ,अथर्व चौगुले – ( सोलापूर शहर, उत्तर विधानसभा ) , संदेश जगताप – ( सोलापूर शहर, उत्तर विधानसभा ) , अविनाश सिद्धूल – ( सोलापूर शहर, मध्य विधानसभा ) . कॉलेज कक्ष अधिकारी – तुषार अवताडे ( सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभा ) , प्रथमेश तपासे ( सोलापूर शहर ). सोशल मीडिया समन्वयक – सौरभ अष्टे – ( सोलापूर ग्रामीण विभाग ) आणि संकेत गोटे – ( सोलापूर शहर विभाग )