Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकलूजमधील ‘सिंहां’च्या बारामतीच्या गडाला ढुसण्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

अकलूजमधील ‘सिंहां’च्या बारामतीच्या गडाला ढुसण्या

Surajya Digital
Last updated: 2022/09/27 at 1:16 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ ‘टप्प्यात आले की करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा मोहिते-पाटलांचा इरादा पक्का

□ भाजपची ताकद घेऊन बारामतीकरांच्या मजबूत गडाला धक्के देण्यासाठी फौज सज्ज

□ बारामतीकर काकांची चाणक्य नीती उलटून टाकणार त्यांच्याच प्रांतात

□ भाजपच्या ‘मिशन बारामती’ व्हिजनमध्ये अकलूजचे सिंह

Akluj Pawar Mohite Patil to storm the Baramati stronghold of ‘Singhs’ in Akluj

Contents
□ ‘टप्प्यात आले की करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा मोहिते-पाटलांचा इरादा पक्का□ भाजपची ताकद घेऊन बारामतीकरांच्या मजबूत गडाला धक्के देण्यासाठी फौज सज्ज□ बारामतीकर काकांची चाणक्य नीती उलटून टाकणार त्यांच्याच प्रांतात□ भाजपच्या ‘मिशन बारामती’ व्हिजनमध्ये अकलूजचे सिंहस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पवार परिवारात उठली चुरचुर

सोलापूर : ‘टप्प्यात आले की करेक्ट कार्यक्रम करायचा’ ही खुद्द बारामतीकर काका पुतण्याची राजकारणातील चाणक्य नीती. याच चाणक्य नीतीचा भाजपवाले त्यातही पर्यायाने अकलूजचे सिंह खुद्द बारामतीच्या प्रांतात करणार आहेत. भाजपच्यावतीने बारामतीच्या मुलुखात फुलवण्यासाठी मिशन बारामती’ हे व्हिजन राबवण्यात येणार आहे.

 

‘मिशन बारामती’ व्हिजन अंतर्गत भाजपची ताकद घेऊन बारामतीच्या मजबूत गडाला धक्के देण्यासाठी अकलूजच्या सिंहांची फौज सज्ज झालीय. यातून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा अकलूजच्या सिंहांचा डाव आहे. शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मुलुखात ‘कमळ’ फुलविताना ज्या पक्षात आपण आहोत, त्या पक्षाला मदत करायची, अन् दुसरीकडे ज्या बारामतीकर काका पुतण्याने मध्यंतरीच्या काळात आपणास किंमत मोजायला लावली, त्याच बारामतीकरांच्या मुलखात ‘कमळ’ फुलवण्याच्या आडून पवार परिवाराच्या पॉवरबाज गडाला धक्के देत, टप्प्यात आले म्हणून करेक्ट कार्यक्रम करायचे हेच सिंहांचे राजकारण अन् त्यांनी बारामतीकरांसाठी टाकलेल्या राजकारणाच्या सोंगट्या.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ह्या बारामतीत आल्या होत्या. नेमक्या याच वेळी मोहिते-पाटील परिवाराचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच धैर्यशील मोहिते-पाटील हे अकलूजचे सिंह या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. या सिंहांनी येथे खास करून उपस्थिती दाखवून बारामतीकर पवार काका – पुतण्याला जे काही दाखवून द्यायचे, ते दिले. जो काही मॅसेज जायला हवा होता, तो पवारांच्या परिवारात तडकावलादेखील.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

तसेच दिल्लीकर भाजपवाले खूष होतील हे देखील अकलूजकरांनी उपस्थिती दाखवून दिले. महाराष्ट्राच्या राजकारणातदेखील आम्ही ‘वजनदार’ आहोत, खुद्द पवारांच्या बारामती प्रांतात जाऊन आम्हीच त्यांच्या विरोधात डरकाळ्या फोडू शकतो, हे देखील दिल्लीसह राज्याच्या नेतृत्वाला मोहिते पाटील यांनी दाखवून दिले. येत्या काळात भाजपच्यावतीने बारामतीच्या प्रांतात मिशन भाजप हे व्हिजन राबवले जाणार आहे, त्यात देखील मुद्दामहून अकलूजच्या सिंहांचा सहभाग असणार आहे. अकलूजच्या सिंहांना डिवचण्याबरोबरच त्यांच्या नेतृत्वाच्या पाडावासाठी जे काही करता येईल, तितके सगळे सगळे बारामतीकर काका – पुतण्याने केले. याची ‘सल’ आजही सिंहांना चांगलीच बोचते आहे. अकलूजचे सिंह ही सल तशी आयुष्यात पर्यायाने जोपर्यंत राजकारणात आहेत, तोपर्यंत ते विसरू शकणार नाहीत.

 

वास्तविक राष्ट्रवादीचा पर्यायाने पॉवरबाज पवारांचा बारामती हा गड अत्यंत भक्कम आहे, या गडाला अकलूजच्या सिंहांनी भाजपची ताकद पाठीशी घेऊन ढुसण्या द्यायला सुरुवात केली आहे. या ढुसण्यांची तीव्रता भविष्यात मोठी असेल. या ढुसण्यांनी पवारांचा मजबूत गड किती हालेल, परिणाम काय होईल, हे येणाऱ्या काळाला कळेल, पण बारामतीच्या भक्कम गडाला ढुसण्या देण्याची दाखवलेली तयारी आणि त्यादृष्टीने टाकलेली पावले इथेच अकलूजच्या सिंहांचे धाडस आणि विजय आहे, असे मानले जातेय.

 

□ पवार परिवारात उठली चुरचुर

 

बारामती हे आमचे साम्राज्य. इथे मर्जी चालेल, ती फक्त आमचीच. इथले राजे फक्त आम्हीच. इथले परमनंट लोकप्रतिनिधी आम्हीच. असे मानणाऱ्या शरद पवार आणि अजित पवारांच्या साम्राज्यात भाजपने चाल करणे हेच अत्यंत भयावह आणि तितकेच विशेषदेखील.

 

मुळात बारामतीच्या प्रांतात भाजपचे ‘कमळ’ फुलण्यासाठी व्हिजन राबवणार हेच पवार काका पुतण्यासाठी – अस्वस्थ करणार. चुळबुळ वाढवणार. पुन्हा त्यात अकलूजच्या मोहिते पाटलांनी यात हिरिरीने भाग घेणे हे तर बारामतीकर काका पुतण्याला अधिकच अस्वस्थ तसेच विचलित करणार. यातून बारामतीकर पवार परिवारात चुरचुर उठलीय. भाजप पर्यायाने अकलूजच्या सिंहाचे राजकीय अतिक्रमण परतवून लावण्यासाठी गड ‘जैसे थे’ अबाधित ठेवण्यासाठी पवार परिवार देखील सजग होणे क्रमप्राप्त आहे.

 

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #Akluj #Pawar #MohitePatil #storm #Baramati #stronghold #Singhs #Akluj #political, #अकलूज #सिंह #बारामती #गड #ढुसण्या #मोहितेपाटील #पवार #अकलूज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी गुरुवारी मतदान; 38 जागांसाठी 75 उमेदवार रिंगणात!
Next Article सोलापूर जिल्ह्यातील दोन महिला सरपंच बेपत्ता; महिला आयोगाने घेतली दखल

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?