□ सुनावली न्यायालयीन कोठडी
सोलापूर : नवरात्रीच्या सणांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एनआयए आणि एटीएसच्या माध्यमातून राज्यभर छापेमारी सुरू आहेत. सोलापुरातदेखील आज मंगळवारी विजापूर नाका पोलिसाने एका पीएफआयच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले असून त्याची कोठडीत रवानगी केलीय. Solapur: PFI worker taken into judicial custody by NIA team
पीएफआय संबंधित असलेल्या एका चाळीस वर्षे इसमाला शहरातील सहारा नगर परिसरातून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत अटक केली आहे. आसिफ शौकत शेख (वय-40,रा.प्लॉट नं.24,सहारा नगर भाग 2, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला सोलापूर न्यायालयासमोर उभे केले असता ६ ऑक्टोबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यापूर्वी देखील शेख याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रतिनिधी व कार्यकर्ते एनआयए, एटीएस व पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहेत. सोलापूर शहरात पीएफआयकडून नुपूर शर्मा प्रकरण, हिजाब प्रकरण, शाहीनबाग प्रकरण, रोंहिग्या मुस्लीम प्रकरण चालू असताना आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तसेच पुणे येथे पीएफआय कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने पुणे येथे घोषणाबाजी केल्याने जातीय तणाव निर्माण झाला होता. सोलापूर शहरातही पीएफआयचे सक्रिय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाल्याने तपास यंत्रणाकडूनही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ’पीएफआय ,एनआयए, एटीएस, गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई केलीय.
सध्या देशात सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरु आहे. पुणे येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातदेखील तशाच स्वरूपाचे आंदोलन नवरात्रोत्सवामध्ये करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात या संघटनेचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याची नोंद आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा व सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे कारवाई करीत त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. विजापूर नाका पोलिस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली. त्यास अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच सोलापूर पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरु आहे.